Zendu Lagwad Kashi Karavi | झेंडू लागवड कोणत्या महिन्यात करावी | झेंडूची लागवड कधी करावी  zendu-lagwad-kashi-karav

Zendu Lagwad Kashi Karavi | झेंडू लागवड कोणत्या महिन्यात करावी | झेंडूची लागवड कधी करावी

Zendu Lagwad Kashi Karavi

Zendu Lagwad Kashi Karavi : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची .आणि एक कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आणि कमी वेळेत अधिक नफा हा मिळवायचा असेल. तर आपल्याला झेंडू यांची शेती फायदेशीर आहे आणि मोठी फायदेशीर सुद्धा आहे. तर या लेखांमध्ये आपल्या शेतामध्ये झेंडू फुलशेती करून आपण लाखो रुपयांची. नफा हा कमी कालावधी मध्ये मिळू शकता त्यासाठी आपल्याला व्यवस्थापन हे कसे करावे लागणार आहे. म्हणजेच लागवडीपूर्वी पूर्वमशागत असेल किंवा खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल शेत जमीन कशी असावी. या संदर्भातील संपूर्ण नियोजन व्यवस्थापन या लेखामध्ये आपण दिलेले आहे .तर हा लेख संपूर्ण वाचा. आणि झेंडू फुल शेती करून लाखो रुपये कमावण्याचं नक्कीच आपण प्रयत्न करा.

झेंडू लागवड  हवामान व जमीन कशी असावी

महाराष्ट्रातील हवामानात झेंडूचे पीक वर्षभर घेता येते.हे पीक उष्ण-कोरड्या तसेच दमट हवामानात चांगले वाढत असले तरी झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. जोराचा पाऊस, कडक ऊन आणि कडक थंडी या पिकाला मानवत नाही. अती थंडीमुळे झाडाचे आणि फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अति तपमानामुळे झाडाची वाढ खुंटते. फुलांच्या उत्पादन प्रक्रियेवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. फुलांचा आकार अतिशय लहान होतो. अलीकडच्या काळात झेंडूच्या काही संकरित बुटक्या जाती विकसित करण्यात आल्या असून त्या थंड हवामानात उत्तम वाढतात.झेंडू या पिकांस भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते परंतु फुले येत नाहीत.

Zendu Lagwad Kashi Karavi

झेंडूचे पीक अनेक प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढू शकते. हलकी ते मध्यम, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन झेंडूच्या पिकास मानवते. भारी आणि सकस जमिनीत झेंडूची झाडे खूप वाढतात. परंतु फुलांचे उत्पादन फारच कमी मिळते. तसेच फुलांचा हंगामही उशीरा मिळतो. झेंडूच्या पिकासाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि ७ ते ७.५ पर्यंत सामू असलेली जमीन चांगली मानवते. शेतीच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला जी मोकळी जागा असते तेथे गाजर, गवत या ताणाचा फैलाव दिसतो. अशा ठिकाणी कमी श्रमात व कमी खर्चात झेंडूचे पीक घेता येईल व त्यामुळे तणांचा उपद्रवही कमी होईल.ज्या जमिनीत सुतकृमींचा प्रादुर्भाव जास्त. जमिनीत झेंडूची लागवड करावी.पाणथळ जमिनीत झेंडूची लागवड करू नये.

झेंडू लागवड जाती मराठी

झेंडूमध्ये अनेक प्रकार व जाती आहेत, यांतील महत्त्वाच्या जाती म्हणजे आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू, संकरित झेंडू. झेंडूच्या झाडाची उंची, झाडाची वाढीची सवय आणि फुलांचा आकार यावरून झेंडूच्या जातीचे हे प्रकार पडतात.हंगामानुसार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य जातींची लागवड करावी.

अ) आफ्रिकन झेंडू – या प्रकारातील झेंडूची झुडपे उंच वाढतात. झुडूप काटक असते. पावसाळी हंगामात झुडपे १००सें.मी. ते १५० सें.मी.पर्यंत उंच वाढतात. फुले टपोरी असून फुलांना केशरी आणि पिवळ्या रंगाच्या छटा असतात. या प्रकारात पांढरी फुले असलेली जातही विकसित करण्यात आली आहे. या प्रकारातील फुले मोठ्या प्रमाणात हारासाठी वापरली जातात.

उदा. पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा,क्रॅकर जॅक, अलास्का, ऑरेंज ट्रेझन्ट, आफ्रिकन टॉल डबल मिक्‍स्ड, यलो सुप्रीम, गियाना गोल्ड, स्पॅन गोल्ड, हवाई, आफ्रिकन डबल ऑरेंज, सन जाएंट, जायंट डबल, आफ्रिकन यलो, ऑरेंज, अर्ली यलो, अर्ली ऑरेंज, बंगलोर लोकल, दिशी सनशाईन, इत्यादी.

ब) फ्रेंच झेंडू – या प्रकारातील झेंडूची झुडपे उंचीला कमी असतात व झुडपासारखी वाढतात. झुडपाची उंची ३०ते ४० सें.मी. असते. फुलांचा आकार लहान ते मध्यम असून रंगात मात्र विविधता असते.या प्रकारातील जाती कुंडीत, बागेत, रस्त्याच्या दुतर्फा तसेच फुलांचा गालिचा तयार करण्यासाठी, हिरवळीच्या कडा सुशोभीकरणासाठी लावतात. 

उदा.पुसा अर्पीता,स्प्रे, फ्रेंच डबल मिक्‍स्ड, बटरबॉल, फ्लेश, यलो बॉय, हार्मोनी बॉय, लिटल डेव्हिल, बायकलर, बटर स्कॉच, लेमन ड्वार्फ यलो, रेड मारिटा, हार्मोनी, रॉयल बेंगाल, क्विन, सोफिया, इत्यादी.

झेंडू लागवड पूर्व तयारी माहिती 

लागवडीआधी जमीन एकसारखी सपाट व तणमुक्त, तसेच पाण्याचा योग्य निचरा होईल अशा पद्धतीने तयार करावी. जमीन नांगरून भुसभुशीत करून त्यानंतर छोटे छोटे वाफे तयार करावेत. तयार केलेल्या जमिनीस हलके पाणी द्यावे. खरीप हंगामात सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी, तर उन्हाळी व रब्बी हंगामात उंच सपाट वाफ्यांत लागवड करावी. एकरी१० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश लागवडीपूर्वीच जमीनीत पूर्णपणे मिसळून घ्यावे.

झेंडू लागवड पद्धत मराठी

१) आंतरपीक- नवीन फळबागेत पट्टा पद्धतीने

२) मिश्र पीक – भाजीपाला पिकात

३) स्वतंत्र लागवड

झेंडू लागवड कशी करावी व कधी ? 

झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. मात्र झेंडू हे थंड हवामानातील पीक असून, थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. 

लागवडीपुर्वी जमिनीचा मशागत करून वरीलप्रमाणे खते आणि २५ किलो १० टक्के लिंडेन अथवा कार्बारिल मातीत मिसळून सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून घ्यावेत. जातीनुसार तसेच हंगामानुसार झेंडू लागवडीसाठी दोन ओळीत, दोन झाडात खालीलप्रमाणे अंतर राखावे.

लागवड करताना प्रत्येक ठिकाणी निवडक असे एकच रोप लावावे.पूर्ण लागवड करताना शक्‍यतो दुपारनंतर करावी. रोपांची लागवड करताना बरोबर अंतर ठेवून खड्ड्याच्या मधोमध रोप लावावे व दोन्ही हातांच्या बोटांनी दाबावे. यामुळे रोपे कोलमडून खाली पडणार नाहीत. पूर्ण लागवडीनंतर लगेच हलकेसे पाणी द्यावे.६० बाय ३० सें.मी.अंतरावर लागवड केल्यास एकरी१६ हजार रोपे लागतात.

झेंडू लागवडीचे वेळापत्रक 

बाजारपेठेत सतत फुलांचा पुरवठा होण्यासाठी १५ दिवसांच्या अंतराने लागवड करावी.

अ. क्र. रोपनिर्मितीची वेळ पुनर्लागवडीची वेळ फुले काढणीची वेळ
१. जाने. दुसरा आठवडा फेब्रु. पहिला आठवडा मे-जून
२. फेब्रु. दुसरा आठवडा मार्च पहिला आठवडा जुलै-ऑगस्ट
३. मार्च दुसरा आठवडा एप्रिल पहिला आठवडा सप्टें.-ऑक्‍टो. 
४. एप्रिल दुसरा आठवडा मे पहिला आठवडा ऑक्‍टो.-नोव्हें.
५. मे दुसरा आठवडा जून पहिला आठवडा ऑक्‍टो.-डिसेंबर
६. जून दुसरा आठवडा जुलै पहिला आठवडा नोव्हें.-जाने.
७. सप्टें. दुसरा आठवडा ऑक्‍टो. पहिला आठवडा फेब्रु.-एप्रिल
झेंडू लागवड खत पाणी व्यवस्थापन

फुलांचे एकसारखे आणि भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी वरखते देणे आवश्यक आहे. लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार एकरी २० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश मिळेल याप्रमाणे खत द्यावे. फक्त नत्रयुक्त खत अथवा अधिक नत्र वापरल्यास पिकाची शाखीय वाढ जास्त होते,परिणामी फुलांच्या उत्पादनात घट होते. लागवडीनंतर १ महिन्याने २० किलो नत्राचा दुसरा हप्ता देऊन झाडांना मातीची भर लावावी.लागवडीनंतर ८-१० दिवसांनी ४ किलो ऍझोटोबॅक्‍टर किंवा ऍझोस्पिरिलम २५ किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून तो ढीग प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा.

zendu lagwad in marathi

अशाच प्रकारे ४ किलो स्फुरद विरघळवणारे जिवाणू खत आणि ४ किलो ट्रायकोडर्मा प्रत्येकी २५ किलो ओलसर शेणखतामध्ये वेगवेगळे ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक एकर क्षेत्रातील झेंडूच्या पिकाला द्यावे. यानंतर एका आठवड्याने शेंडाखुडीचे काम पूर्ण करावे, त्यामुळे बाजूस फांद्या फुटतात आणि फुलांची संख्या भरपूर वाढते. 

झेंडूच्या पिकाला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच याच काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये. हिवाळी हंगामातील पिकासाठी ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळी हंगामासाठी ५ ते ७ दिवसांनी (Zendu Lagwad Kashi Karavi) पाणी द्यावे.

आंतरमशागत :

लागवडीनंतर १५ दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यानंतर १५ दिवसांनी २० किलो नत्राचा दुसरा हप्ता देऊन झाडांना मातीची भर लावावी.त्याचवेळी रोपाचा शेंडा खुडावा म्हणजे झेंडूच्या रोपास भरपूर फांद्या फुटतात व उत्पादन चांगले येते.


📢 200 गाय पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!