Wire Fencing Subsidy 2023: शेतकऱ्यांसाठी जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपल्या शेतामध्ये तार कुंपण करून शेतीचे संरक्षण करण्यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. ती योजना म्हणजे तार कुंपण अनुदान योजना.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी लाभ घ्यावा असे सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे.
तार कुंपण योजना 2023 योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज कोठे करायचा? त्यासोबत अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?आणि ही योजना राबवण्यामागे सरकारचा नेमका काय उद्देश आहे? यासंबंधीची सर्व माहिती आजच्या या लेखामार्फत आपण घेणार आहोत. तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Wire Fencing Subsidy 2023
ही योजना डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येत आहे. या काटेरी तार कंपनी योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये काटेरी तार कुंपण करण्यासाठी सरकारकडून 90% पर्यंत अनुदान देण्यात येत आहे.
म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात (Wire Fencing Subsidy 2023) येणारी ही काटेरी तार कुंपण योजना एक महत्त्वपूर्ण योजना मानली जात आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतामध्ये दार कुंपण करून त्यांच्या शेतीचे जंगली जनावरांपासून तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळू शकते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने 90 टक्के अनुदानावर काटेरी तार व काम पुरवण्यात येतात.
अटी आणि नियम
- ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे, त्या शेतकऱ्यांच्या सदर जागेवर अतिक्रमण नसावे.
- शेतकऱ्यांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसावे.
- सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील दहा वर्ष बदलता येणार नाही असा ठराव समितीला सादर करावा लागेल.
अर्ज कुठे करायचा
शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे नुकसानी होत असल्याबाबत ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल.
या तार कुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी तार सोबतच 30 खांब 90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहेत. तर उर्वरित दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.
तर शेतकरी मित्रांनो,आशा करतो की वर दिलेली सर्व (Wire Fencing Subsidy 2023) माहिती तुम्हाला समजली असेल. अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सुद्धा भेट देऊ शकता.
तार कुंपण योजना योजनेअंतर्गत जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर तो अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे. विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्याने आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे.
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे
काटेरी तार कुंपण योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करायचा (Wire Fencing Subsidy 2023) असल्यास आपल्याला अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडायचे आहेत.
- सातबारा उतारा
- गाव नमुना ८ अ
- जात प्रमाणपत्र
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- एकापेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्जदाराला
- प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र
- ग्रामपंचायतीचा दाखला
- समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
1 thought on “Wire Fencing Subsidy 2023 Best | तार कुंपण अनुदान योजना 2023 या योजनेत तार कुंपण साठी मिळणार 90% अनुदान”