Turiche Top 5 Biyane | तुरीचे अधिक उत्पन्न देणारे top 5 बियाणे

Turiche Top 5 Biyane : शेतकरी बंधूंनो,  सर्वप्रथम आपण मोठ्या प्रमाणात स्विकारलेला आणि अलीकडील काही वर्षात वांझ रोगाला रोगाला बळी पडत चाललेला मारोती (ICP 8863 ) या तुरीच्या वाणाची पेरणी टाळा.

शेतकरी बंधूंनो आपण ज्याला मर उबळणे जळणे यासारखी लक्षणे म्हणतो या जातीत वांझ रोगामुळे  मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे आणि त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होते म्हणजे शास्त्रीय भाषेत मारोती हा वान वांझ या रोगाला बळी पडतो म्हणून या वाणाची पेरणी टाळा.

शेतकरी बंधूंनो तुरीच्या वाणाची निवड करताना जमिनीच्या प्रकारानुसार करणे गरजेचे असते. कारण भारी जमिनीत अधिक उत्पादन देणारे तुरीचे वाण हे मध्यम ते हलक्या जमिनीत तसेच उत्पादन देतील असे नाही.  

 हेही वाचा :- कुकुट पालन सठी मिळणार 50% अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज 

Turiche Top 5 Biyane

मध्यम प्रकारच्या जमिनीकरिता कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या जाती उदाहरणार्थ एकेटी 88 11  सारख्या वाणाची  आपण निवड करू शकता. याउलट भारी जमीन असेल तर  मध्यम कालावधीत  परिपक्व होणाऱ्या म्हणजे 170 ते 180 दिवसात येणाऱ्या उदाहरणार्थ पीकेव्ही तारा, बीएसएमआर 736 यासारख्या वाणाची आपण निवड करू शकता.

शेतकरी बंधुंनो मध्यम कालावधीत येणारे पीकेव्ही तारा ,बीएसएमआर 736 किंवा बीडीएन 716 यासारखे तुरीचे वान किंवा अति अति उशिरा परिपक्व होणारे आशा (ICPL 87119) यासारखे वान मध्यम ते भारी जमिनीत संरक्षित  ओलितला   प्रतिसाद देणारे आहेत.

तुरीचे अधिक उत्पन्न देणारे वाण

वर निर्देशित मुद्द्यावरून एक सारांश लक्षात घ्या की तुरीच्या वाणाची निवड करताना आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे, आपल्याला बाजारात तुरी कोणत्या कालावधीत विक्रीसाठी न्यावयाचे आहेत म्हणजेच तुरीच्या वानाचा कालावधी कोणता आहे तसेच आपल्याकडे संरक्षीत ओलीत आहे

किंवा नाही  या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या स्थानिक जमिनीच्या प्रकाराचा व इतर बाबीचा विचार करून तुरीच्या वाणाची निवड करावी शास्त्रीय भाषेत बोलायचे झाल्यास आपल्या स्थानिक परिसंस्थेचा अभ्यास करून तुरीच्या वाणाची निवड करणे गरजेचे आहे

  हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड पालन अनुदान योजना 2022 सुरु 

तूरीच्या जातीची नावे

PKV -तारा

 • डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे विकसित
 • व्यशिष्टय
 • 178 ते 180 दिवसात काढणीस तयार
 • 100 दाण्याचे वजन 9.6 ग्राम
 • हेक्टरी 20 क्विंटल उत्पादन
 • रोगाशी लढण्यास सक्षम

BSMR-736

 • 170 ते 180 दिवसात काढणीस येणार
 • 100 दाण्याचे वजन हे 11 ग्राम आहे
 • 15 ते 16 क्विंटल हेक्टरी उत्पादन
 • या वाणाचे दाणे मध्यम आकाराचे व तांबड्या रंगाचे असतात
 • रोगाशी लढण्यास सक्षम

हेही वाचा :- कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु आजचा करा ओनालैन अर्ज 

BDN-716

 

 • 165 ते 170 दिवसात काढणीस तयार
 • हेक्टरी 22 क्विंटल पर्यंत उत्पन्न
 • उत्तम प्रकारच्या दाळीसाठी उत्तम
 • वांझ रोग प्रतिकारक
 • लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन संरक्षित

VIPUL

 • महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे विकसित
 • 150 ते 170 दिवसात काढणीस तयार
 • आतरपिक पद्धतीसाठी योग्य
 • वांझ रोग मध्यम प्रतिकारक
 • 26 क्विंटल प्रति हेक्टरी उतपन्न
BSMR-853
 • वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाद्वारे विकसित
 • 170 ते 175 दिवसात परिपकव होणारा वाण
 • मध्यम आकाराचे पांढऱ्या रंगाचे दाणे
 • वांझ रोगास प्रतिकारक
 • अंतर पीक पद्धतीसाठी योग्य
 • 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न

📢 DAP खताच्या गोनीची नवीन किंमत जाहीर :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी मिळणार 50% अनुदान आजच करा अर्ज :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!