Tur Lagvad Mahiti Marathi | पावसाळी तूर लागवडी विषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये

Tur Lagvad Mahiti Marathi : नमस्कार मंडळी आम्ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलो आहे ती म्हणजे पावसाळी तूर लागवड कशी करावी या विषयी सविस्तर माहिती घेऊन आलो आहे की तूर लागवडी साठी जमीन कशी असावी तूर लावण्या अगोदर जमीनीची पूर्व माश्यागत काय कारवी तूर किती अंतरावर लावावी तूर पिकावर येणारे रोग कोणते तुरीचे जास्त उत्पन्न देणारे बियाणे कोणते आहे तुरीच्या रोगावर कोणते औषधे मारवीत या विषयी सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत त्या साठी हा लेख संपूर्ण वाचा

Tur Lagvad Mahiti Marathi

 1. तूर लागवड व उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञानाचे पुरेसे ज्ञान शेतकऱ्यांना अवगत नसणे.
 2. तूरीची लागवड पारंपारिक पद्धतीने करणे.
 3. जास्त उत्पादन देणाऱ्या तसेच किडी  व रोगांना प्रतिकारक्षम असणाऱ्या जातींबद्दल शेतकऱ्यांना माहिती नसणे.
 4. खरीप हंगामातील तूर लागवड ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते त्‍यामुळे खतपाणी व्यवस्थापन याकडे शेतकरी दुर्लक्ष करतो. त्यामुळे पीक उत्पादनात जवळपास 50 टक्के इतकी घट  येते.
 5. तूरीची पेरणी योग्य वेळ न करणे.
 6. तूरीच्या पिकांवर किडी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचा अभाव.

तूर उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबी :

 1. तूरीची लागवड सुधारित तंत्रज्ञानाने करावी.
 2. कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित व संकरित जातींचा अवलंब करावा.
 3. तूरीची पेरणी शक्यतो जून पहिला पंधरवाडा ते 31 जून पर्यंत करण्यात यावी.
 4. तूरीच्या बियाण्याला पेरणीपूर्वी कार्बेन्डेझिम व रायझोबियम जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.
 5. तूरीची पेरणी शक्यतो टोकण पद्धतीने आधुनिक  यंत्राद्वारे करण्यात यावी.
 6. तूरीमध्ये  सोयाबीन सुर्यफूल अशा आंतरपीक पद्धतीचा वापर करावा.
 7. तूरीला घाटे लागण्याच्या अवस्थेत किंवा परिपक्व होण्याच्या कालावधीत दोन संरक्षित पाणी द्यावे.
 8. काढणी व मळणीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
 9. मळणी झाल्यानंतर धान्य चांगले वाळवून व कीडमुक्त पोत्यात स्वच्छ करून भरावे.

तूर लागवड कश्या प्रकारे करावी 

प्रस्तुत लेखामध्ये तुरीसाठी लागणारे हवामान व जमीन तसेच तूरीचे सुधारित वाणाची निवड, बीजप्रक्रिया, पूर्व मशागत, बियाणे प्रमाण, लागवड हंगाम, लागवड पद्धत, आंतरमशागत, आंतरपिके, खत व पाणी व्यवस्थापन, किडीं व रोगांचे व्यवस्थापन, काढणी, मळणी, साठवण व उत्पादन आदी घटकांविषयी माहिती देण्यात येत आहे.   

तूर लागवडीसाठी हवामान 

तूर पिकास उष्‍ण  दमट हवामान  चांगले मानवतेज्या प्रदेशात पर्जन्यमान 750 ते 1000 मिलीमीटर आहेअशा प्रदेशात हे पीक चांगले येतेपुरेसा ओलावाकोरडे हवामान  स्‍वच्छ सूर्यप्रकाश पिकास आवश्‍यक असतोढगाळ वातावरणात फुलगळ आधिक होते  परिणामी शेंगांमध्ये दाणेभरले जात नाहीतपिकाच्या शाखीय वाढीच्या काळात पाण्याची गरज आधिक असतेसामान्यपणे तापमान 21 ते 25 अंश सेपोषक असतेबियाची उगवण होताना 15 अंश सेतापमानाची गरज असते त्यानंतर यापिकास पिकाचा उत्पादनक्षम कालावधी संपेपर्यंत 40 अंशसेतापमानमानवते महाराष्ट्राच्या मध्‍य महाराष्ट्रपठारी विभागपश्चिम महाराष्ट्र कमीपावसाचा प्रदेशपश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेशउपपर्वतीय विभाग भागांमध्ये तूर पिकाचीलागवड केली जाते 

तूर लागवडी साठी जमीन कशी पाहिजे 

तूर पिकास मध्‍यमते भारीखोलपाण्याचा उत्तम निचऱ्याची 45-60 सें.मीखोल जमीन निवडावीक्षारयुक्‍तचोपणपानथळ जमीन यापिकाच्या लागवडीकरिता वापरू नयेजमिनीत गंधककॅल्शियम  मँगनीजसूक्ष्‍म अन्‍नद्रव्याची कमतरता नसावीतूरपीक काढणीनंतर जमिनीत पडणारा पालापाचोळा यांपासून मिळणाऱ्या सेंद्रिय खतामुळे जमिनीचे आरोग्‍य सुधारण्यास मदत होतेतूरपिकामुळे एकरी 50-80 किलो नत्र जमिनीतसाठविले जाते  पुढील पिकास उपलब्‍धहोते.  जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावातूरपीक अल्प प्रमाणात क्षार सहनशील असल्याने जमिनीचा आम्‍लविम्‍लनिर्देशांक (सामू) 8.4 असला तरीही चालतोजमिनीत मातीचे प्रमाण 45 टक्केसेंद्रीय पदार्थ 5 टक्केहवा 25 टक्के पाणी 25 टक्केहे योग्‍य प्रमाणातअसावे. अशा प्रमाणे तूरीसाठी जमीन निवडावी.

तूर लागवडीसाठी सुधारित वाणाची निवड   

महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केलाअसता महाराष्ट्राकरिता आयसीपीएल -87, युपीएएस-120, एकेटी -8811, विपुलाबीएसएमआर -853, अशा या वाणाची शिफारस केलेली आहेकारण हे वाणस्थानिक वाणांपेक्षा 15-20 टक्केआधिक उत्पादन देतातया शिवाय मर वांझ रोगप्रतीकारक्षम आहेत. तसेच महाराष्ट्रासाठी उपयुक्त व दर्जेदार तूरीचे शिफारस केलेल्या वाण, कालावधी, गुणवैशिष्ट्ये, उत्पादन याविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे: 
आशा (आय. सी. पी. एल. 87119) : हा वाणाची महाराष्ट्रमध्यप्रदेशकर्नाटकआंध्र प्रदेशगुजरात इ. राज्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. पिकांचा पक्‍व होण्याचा कालावधी सरासरी 170-200 दिवसांचा आहे. दाणे आकाराने टपोरे व रंग तांबडा असूनमर आणि वांझ रोगांना प्रतिकारक्षम आहे.  या वाणापासून प्रतिहेक्टरी सरासरी 18 ते 20 क्विंटल उत्पादन मिळते.
प्रगती (आय. सी. पी. एल.- 87) : या वाणाच्या झाडाची वाढ बुटकी असून शेंगा झुपक्याने लागतात. शेंगामधील दाणे मध्‍यम आकाराचे व रंगाने तांबडे असतात. पीक पक्वतेचा एकुण कालावधी सरासरी 120-125 दिवस इतका असतो. हा वाण लवकर पक्‍व होणारा असल्याने शेतकऱ्यामध्ये लोकप्रिय आहे. सरासरी उत्पादन 20-25 क्विंटल प्रति हेक्टरी  मिळते. अमोल (बी. डी. एन.- 708) : या वणाच्या शेंगामधील दाणे मध्‍यम आकाराचे असून रंगाने तांबडे आहेत. सरासरी उत्पादन 18-20 क्विंटल प्रतिहेक्टरी मिळते.
बीडीएन – 711 : हा वाण तयार होण्यास सरासरी 150 ते 160 दिवसाचा कालावधी लागतो. ही जात कमी कालावधीत तयार होणारी असून मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे. या जातीचे प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन 16 ते 18 क्विंटल इतके आहे.
बीडीएन – 2 : या वाणाचा पीक पक्वतेचा कालावधी सरासरी 150-16 दिवस इतका आहे. शेंगामधील दाणे मध्यम आकाराचे व रंगाने पांढरे असतात. ही जात मर रोगास प्रतिकारक्षम आहे. प्रतिहेक्टरी 11-17 क्विंटल उत्पादन मिळते.
बीजप्रक्रिया 
बियाची उगवण चांगली होण्यासाठीरोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी तूरीच्‍या प्रति किलो बियाण्‍यास 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा अथवा 2 ग्रॅम थायरम व 2 ग्रॅम कार्बन्‍डॅझिम एकत्र करून बियाण्‍यास चोळावे. त्‍यानंतर प्रति 10 किलो बियाण्‍यास ऱ्हायझोबियम  जिवाणू संवर्धकाचे 250 ग्रॅम वजनाचे एक पाकीट गुळाच्‍या थंड द्रावणात मिसळून चोळावे. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थोडा वेळ बियाणे सुकवून त्वरित पेरणी करावयाची आहे.

तूर लागवड करायच्या आधी  मशागत

तूर पिकाची मुळे जमिनीत जास्त खोलवर जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. पूर्वीचे पीक निघाल्याबरोबर जमिनीची ट्रॅक्टरच्या साह्याने खोलवर 25 सें.मी. नांगरणी करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन-तीन पाळया द्याव्यात. त्यामुळे जमीन उघडी पडून सुप्त अवस्थेतील किडी घडे पडतातपक्षी किडे खाताततसेच काही किडीकडक उन्हात रण पावून नष्ट होतात. कुळवाचे  उभे व आडव्या  4  पाळ्यादेऊन जमीन भुसभुशीत करावीत्यानंतर शेतातील काडीकचराधसकटे वेचून शेत स्‍वच्छ करावे.

तुर पिकासाठी कोणत्या खताचा वापर करावा 

कुळवाच्‍या शेवटच्‍या पाळीपूर्वी एकरी 9 ते 10 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोष्‍ट खत हेक्टरी अंदाजे 25 ते 30 गाड्या टाकून जमिनीत चांगले मिसळावे. शेणखताऐवजी गांडूळखत खताचा वापर केला तरी उत्तम आहे. भरखतांमुळे जमीन चांगली भुसभुशीत होऊन पिकाच्‍या मुळ्या खोलवर जमिनीत जाऊन पिकाची जोमदार वाढ होण्‍यास मदत होते.
तुरीची लागवड कोणत्या हंगामात करवी 
तूरीची पेरणी खरीप हंगामातकेली जातेमान्सूनचा समाधानकारक पाऊस पडल्यावर आणि जमिनीत वाफसा स्थिती निर्माण होताच पेरणी करावीपाऊस अनियमित पडल्यास पेरणीस उशीर होतो आणि उत्पादनात घटयेतेउशिरा पेरणी केलेल्या पिकांना लवकर पेरलेल्या पिकाबरोबरच फुले येतात पण त्यांच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाहीत्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येताततसेच फुले आणि शेंगांची संख्या देखील कमी राहते आणि उत्पादनात घट येतेवाढ कमी होऊन फांद्या कमी येताततसेच फुले आणि शेंगांची संख्या देखील कमी राहते आणि उत्पादनात घट येतेखरीप हंगामातील तूरीची लागवड ही जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा  किंवा उशीराने करावयाची असल्यास जुलै अखेर पर्यंत पेरणी करावी त्यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.
बियाणे प्रमाण 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी यांच्या शिफारशीनुसार तूरीचे प्रतिहेक्टर बियाणे प्रमाण 12 ते 15 किलोएवढे आहेफक्‍त तूरीचे पीक घेतल्यास गरव्या जातीचे  12 ते 16 किलो बीनिमगरव्या जातीचे16 ते 24 किलोबी आणि हळव्या वाणांसाठी 20 किलोबी प्रती हेक्टरी पेरावेतूर हे ज्यावेळेस आंतरपीक म्हणून घेतले जाते त्यावेळी वरी बियाण्यास 25 ते 30 टक्के इतके बियाणेपुरेसे आहे.  
लागवड पद्धत 
तूर पिकाची लागवड तिफणीच्या सहाय्याने बी पेरूनच केली जातेसामान्यपणे तिफणीने तूरीचीपेरणी रीपात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जूलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावीसंकरित बियाणांची पेरणी टोकण पद्धतीने करतातत्यासाठी तूरीच्या हलक्यानिमगरव्या आणि गरव्याजातींसाठी अनुक्रमे 45 x 15 से.मीअंतरठेवावे   
क्रीडा टोकण यंत्राचा वापर
तूर पिकाची पेरणी ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राद्वारे करावी. सलग तूर पीक पद्धतीत खरीप हंगामात 45 10 सें.मी. अथवा 30 15 सें.मी. अंतरावर पेरणी करावी. तसेच आवश्‍यकतेनुसार लागवडीचे दोन रोपातील अंतर 60 x 75 सें.मी. असे ठेवावे. तूरीची पाभरीने पातळ पेरणी केल्‍यास हेक्‍टरी 12 किलो बियाणे 4 ते 5 सें.मी. खोल पडेल अशाप्रकारे पेरणी करावी. उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी नांगे भरणी करावी. 10 ते 15 दिवसांनी विरळणी करून दोन रोपांमध्‍ये 25 ते 30 सें.मी. अंतर ठेवावे. आवश्यकतेनुसार लागवडीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.   
आंतर मशागतीचे कामे   
 1. रोपांची योग्य संख्या ठेवणे :तूरीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी प्रती हेक्टरी तूरीच्या रोपांची संख्या मर्यादित ठेवावी.
 2. कोळपणी करणे : तूरीमध्ये पेरणीपासून 25 ते 30 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. त्यानंतर गरजेनुसार दुसरी कोळपणी करावी.
 3. खुरपणी करणे : तूरीतील तणांचा खुरपणीद्वारे वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा उत्पादनावर विपरित परिणाम होतो.
 4. आच्छादनाचा वापर करणे : अवर्षप्रवण भागात तूर पिकासाठी तापमान अधिक असल्यास आच्छानाचा आवश्यकतेनुसार वापर करावा.
तूर पिकासाठी खत व्यवस्थापन कसे करावे 
तूर पिकास प्रति हेक्टर 25 किलो ग्रॅम नत्र, 50 किलो ग्रॅम स्फुरद 50 किलो ग्रॅम पालाशची आवश्यकता असतेही रासायनिक खते पिकास पेरणीच्या वेळी दिली जातातमात्रही खते योग्‍यप्रमाणात देणे गरजेचेअसते पिकास रासायनिकखतांची असलेली गरजकाढण्यासाठी प्रथम मातीपरिक्षण करून घ्यावेजेणेकरून त्या मातीमध्येअसलेल्या अन्‍नद्रव्यांची कमतरताव विपुलता (Tur Lagvad Mahiti Marathi) लक्षात येते.
पाणी व्यवस्थापन 
तूर पिकाच्या महत्वाच्या अवस्थांमध्येपाण्याचा अभाव झाल्यासत्याचा परिणाम त्यापासूनमिळणाऱ्या उत्पादनावर होतोपावसामध्ये खंड पडल्यासकिंवा पाण्याचा ताणपडल्यास  सिंचनाचीसुविधा उपलब्ध असेल तूरया पिकास वाढीच्याअवस्थेमध्ये (पेरणीनंतर 30-35 दिवसफुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये (60-70 दिवस शेंगा भरण्याच्याअवस्थेमध्ये पाणी द्यावेत्यामुळे पीक उत्पादनात वाढहोतेचांगल्याव्यवस्थापनात सरासरी18 ते 20 क्विंटलप्रति हेक्टर उत्पादनमिळू शकते.
आंतरपिके 
आंतरपीक पद्धतीत एकाच शेतातएकाच हंगामात दोन पिके घेण्यात येतात. त्यात एक प्रमुख पीक असतेतर दुसरे दुय्यम पीक असते. पिकांची पेरणी ओळींच्या ठराविक प्रमाणात केली जाते.  तूर हे बहुतांशी आंतरपीक म्हणून घतले जाते. तूर + सोयाबीन (1 : 2)तूर + सोयाबीन (1:3 किंवा 1:4) तूर + ज्वारी (1:2 किंवा 1:4) व तूर + भूईमुग पीकसुद्धा चांगले उत्पादन देते. आंतरपिकासाठी निवडावयाच्या तूरीच्या जाती या मध्यम मुदतीच्या असाव्यात. अलीकडच्‍या काळात 3 ते 4 ओळी सोयाबीन आणि 1 ओळ तूर अशा पद्धतीने दोन्‍ही पिकांचे चांगले उत्‍पादन येत (Tur Lagvad Mahiti Marathi) असल्‍याचे दिसून येते.
प्रमुख किडींचे नियंत्रण 
शेंगा पोखरणारी अळी : सुरूवातीच्या  काळात पाने व देठांवर पोसतात अळ्या शेंगाना छिद्रे पाडून दाणे.
उपाय : अळ्या गोळा करून नाश करणेहेलीओकील या जैविक कीटकनाशकाचा वापर करावा 500 मी. ली. / हे तीन फवारण्या कराव्या. 
पिसारी पतंग / तुरेवाला पतंग : लहान अळी कळ्याफुले शेंगाना छिद्र पाडून दाणेखातेमोठी अळी शेंगावरील छिद्र पाडून दाणे खाते.
उपाय : अळींचा प्रादुर्भाव दिसताच निबोंळी अर्काची प्रतिकारात्मक उपाय म्हणून फवारणी करावी. प्रोफेनोफॉस 25 मी. ली. / 10 ली. फवारणी पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना व 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
शेंगावरील ढेकूण : पाने व शेंडे यातून रस शोषतेझाडे निस्‍तेज होऊन वाळतात.
उपाय : कीड प्रतिबंधक वाण वापरावे. झाडे हलवून रॉकेल मिश्रित पाण्यात ढेकणांचा नाश करावाडामेथोएट 10 मि. ली. / 10 ली. पाण्याततून फवारणी करावी.
मिज माशी : अळीची वाढ खोडातच पूर्ण होते. शेंगात दाणे भरत नाहीतशेंगा कमी लागतात. दाणे लहान राहतात.
उपाय :  पेरणीचे वेळी 10 टक्के फोरटे 10 किलो प्रती हेक्टरी वापरावे किंवा 5 टक्के  डायसल्फोरटॉन 20 किलो प्रती हेक्टरी या प्रमाणात वापरावे.
खोड माशी  : स्वत: केलेल्या  खाचेत अंडी घालते. अळ्या खोड पोखरून आत शिरते. रोपाचा शेंड्याकडील भाग वाळतो.
उपाय :  स्वच्छ मशागत करावी. मेटासिस्‍टॉक 10 मी. ली. / 10 ली. पाण्यातून फवारणी करावी.
भुंगरे : फुलकळी व फुले अधीशीपणे खातात. एक दिवसात एक भुंगा 25 ते 30 फुले खराब करतो.
उपाय :  1) जाळीच्या साहाय्याने भुंगे पकडून त्याना स्‍पर्श न करता त्यांचा नाश करावा.
पानावरील तुडतुडे : पानातील रस शोषल्‍याने पाने तपकिरी होतात व सुकतात.
उपाय :  डामेथोएट 10 मि. ली. प्रति 10 ली. पाण्यातून फवारणी करावी.
प्रमुख रोगांचे नियंत्रण 
तूरीवर आढळून येणाऱ्या रोगांपैकी मररोग (फ्युजॅरियमउडम)वांझ रोगमुळकुजखोडकुजतूरीवरील करपा, कॅकर हे रोग असून याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे :
तूर पिकाची काढणी किती दिवसात करावी 
तूरीच्या शेंगा 70 ते 80 टक्‍के रंग बदल्‍यास म्‍हणजे तपकिरी रंगाच्‍या झाल्‍या किंवा वाळल्‍या की पीक काढणीस तयार झाले असे समजावे. साधारणपणे झाडावरील दोन तृतीयांश किंवा तीन चतुर्थांश शेंगाचा रंग बदलला की पीक काढणीस घ्‍यावे. जून-जुलै मध्‍ये पेरणी  केलेले पीक डिसेंबरच्‍या शेवटच्‍या आठवड्यात काढणीस येते. अधिक उत्‍पादन प्राप्‍त करण्‍यासाठी पहिल्‍या फुलोऱ्यात शेंगा तयार झाल्‍यावर पीक न कापता फक्‍त तयार झालेल्‍या शेंगा झाडावरून काढून घ्‍याव्‍यात. नंतरच्‍या फुलोऱ्यावरील शेंगा पुन्‍हा महिना भराने काढणीस तयार होतात. तूरीच्‍या शेंगासह झाडे खोडापासून विळ्याने कापून त्‍याच्‍या पेंढ्या (Tur Lagvad Mahiti Marathi) बांधून ठेवाव्या.  
तुरीचे उत्पन्न हेक्टरी किती होते 
तूर पिकाचे सरासरी 25 ते 30 ‍क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. परंतु सुधारित पद्धतीने लागवड केल्यास अथवा सुधारित वाणांची लागवडीसाठी अवलंब केल्यास उत्पन्नात लक्षणीय वाढ  होते.

📢 कडबा कुट्टी मशीन योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

📢 सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!