Tractor Anudan Yojana 2022 | ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म कसा भरावा

Tractor Anudan Yojana 2022 | ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म कसा भरावा

Tractor Subsidy In Maharashtra

Tractor Anudan Yojana 2022 : कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण हे २ किलोवॅट प्रती हेक्टर पर्यंत वाढविणे या उद्देशाने महाराष्ट्र सरकार दरवर्षी नवनवीन योजना MahaDBT Portal च्या माध्यमातून राबवित असते. त्या पैकीच एक महत्वाची योजना म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 होय, आज आम्ही तुम्हाला Tractor Anudan Yojana 2021 बद्दल संपूर्ण माहिती जसे की ऑनलाइन अर्ज कसा करायचा, कोण-कोणती कागदपत्रे या योजनेसाठी लागतात तसेच पात्रता काय असावी.

ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्रे

 1. आधार कार्ड 
 2. ७/१२ उतारा 
 3. ८ अ दाखला 
 4. खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल 
 5. जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी ) 
 6. स्वयं घोषणापत्र 
 7. पूर्वसंमती पत्र

Tractor Subsidy Scheme 2022

योजना ट्रॅक्टर अनुदान योजना 2022
विभाग कृषि विभाग महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

Tractor Anudan Yojana Maharashtra 2022 

योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार कडून अर्थसहाय्य देण्यात येईल.

 

 •  ट्रॅक्टर 
 •  पॉवर टिलर 
 •  ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे 
 •  बैल चलित यंत्र/अवजारे 
 •  मनुष्य चलित यंत्र/अवजारे 
 •  प्रक्रिया संच 
 • काढणी पश्च्यात तंत्रज्ञान 
 • फलोत्पादन यंत्र/अवजारे 
 • वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
 • स्वयं चलित यंत्रे

 

Tractor Anudan Yojana 2022 Maharashtra

कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकार कडून नवनवीन योजना ह्या दरवर्षी राबविल्या जात असतात. या योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना महाराष्ट्र सरकार कडून कृषी औजारांवर तसेच यंत्रांवर अनुदान उपलब्ध करून दिल्या जाते. शेतकर्‍यांना जर या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर त्यांना MahaDBT पोर्टल च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 च्या माध्यमातून शेतकर्‍यांना १) ट्रॅक्टर २) पॉवर टिलर ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे ४) बैल चलित यंत्र/अवजारे ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे ६) प्रक्रिया संच ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे १०) स्वयं चलित यंत्रे इत्यादि गोष्टींवर सरकार कडून अनुदान मिळते. जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे तसेच प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. हा ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 चा उद्देश आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता 2022 
 1. शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. 
 2. शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
 3. शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक.
 4. फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.
 5. कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
 • एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल. उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ पात्र ठरणार नाही (Tractor Anudan Yojana 2022) सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील.

📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार ? :- येथे पहा 

📢 50 पेक्षा शेतकरी अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!