Top 5 Buffalo Breeds | या पाच जातीच्या म्हशी देतात सर्वात जास्त दुध पहा त्या कोणत्या आहे

Top 5 Buffalo Breeds | या पाच जातीच्या म्हशी देतात सर्वात जास्त दुध पहा त्या कोणत्या आहे

Top 5 Buffalo Breeds

Top 5 Buffalo Breeds: नमस्कार देशात पूर्वीपासून शेती (Farming) समवेतच शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन (Animal Husbandry) केले जात आहे. पशुपालनात सर्वाधिक म्हशीचे पालन आपल्या देशात केले जाते. खरं पाहता दुग्धव्यवसायासाठी म्हशीचे सर्वाधिक पालन केले जाते.

आपल्या राज्यात देखील म्हशीचे पालन खूप प्रचलित आहे. शेतकरी बांधव (Farmer) शेती करण्याबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून म्हशींचे पालन करून चांगला नफा कमावत आहेत.

म्हैस पालन (Buffalo Rearing) हे मुख्यता दुग्ध व्यवसायासाठी केले जात. असल्याने दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी म्हशीच्या चांगल्या जाती निवडणे आवश्यक असल्याचे तज्ञ सांगत असतात.

Top 5 Buffalo Breeds

हिरवा चारा, पशुखाद्य, उत्तम देखभाल आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी (म्हशींचे आरोग्य) देखील या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन म्हैस पालन केले तर शेतकरी बांधवांना खूप मोठा याचा फायदा होणार आहे.

अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी भारतातील म्हशीच्या काही प्रमुख जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया म्हशीच्या काही प्रमुख जाती (Buffalo Breed) आणि त्यांच्या विशेषता.

हेही वाचा :-500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

भारतातील म्हशीच्या काही प्रमुख जाती 

मुर्राह म्हैस:-

मुर्राह ही एक म्हशीची प्रगत जात म्हणून ओळखली जाते. ही जात भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाळली जाते. म्हशीची ही जात दुग्धोत्पादनासाठी विशेष ओळखली जाते. या म्हशीला जगातील सर्वात जास्त दूध देणारी म्हैस म्हणून ओळखतात.

मूळतः भारताच्या भूमीशी संबंधित ही म्हशीची देशी जात आपल्या देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या राज्यात मोठ्या प्रमाणात पाळली जाते. ही जात दुग्ध उत्पादनात चांगली असल्याने पशुपालकांची पहिली पसंती आहे. उत्तम आहार आणि देखभालीमुळे मुर्राह म्हैस वर्षभरात 1000-3000 लिटर दूध देत असल्याचा दावा केला जातो.

सुरती म्हैस:-

सुरती म्हैस देखील भारतातील म्हशीची एक प्रगत जात आहे. ही जात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात मोठा हातभार लावत आहे. ही म्हैस पूर्वी गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात आढळत असे.

मात्र आता या म्हशीचे उत्तर भारतात दुग्धव्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात पालन केले जाऊ लागले आहे. या म्हशीचा आकार इतर म्हशींपेक्षा थोडा लहान आहे. मात्र या म्हशीला चांगले पशुखाद्य दिल्यास ती वर्षभरात 1600-1800 लिटर दूध देत असल्याचा दावा केला जातो.

जाफराबादी म्हैस:-

ही जाफराबादी म्हैस देखील दुग्धउत्पादनाला चांगली असल्याचे सांगितले जाते. या जातीच्या म्हशीची उंची इतर म्हशीच्या तुलनेत अधिक असते. जाफ्राबादी म्हैस देखील चांगले दूध देते. यामुळे पशुपालक शेतकरी बांधव या म्हशीचे मोठ्या प्रमाणात पालन करत असतात. याच्या दुधात 8% फॅट असते.

यामुळे या म्हशीच्या दुधाला मोठी मागणी असते, शिवाय या म्हशीच्या दुधाने शरीर मजबूत होते. ही म्हैस गुजरातच्या गीर जंगलातली आहे. जाफ्राबादी म्हशीपासून वर्षभरात 1800 ते 2900 लिटर दुधाचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

हेही वाचा :- आपल्या विहीर किवा बोअरवेल लागणार 100% पाणी या पद्धतीचा करा वापर

मेहसाणा म्हैस:-

मेहसाणा ही म्हशीची एक सुधारित जात आहे. ही म्हैस सुरती आणि मुर्राह म्हशींपासून संकरित करण्यात आली आहे. ही म्हैस इतर जातींच्या तुलनेत खूपच शांत आहे. मेहसाणा म्हशीच्या दुधात 7% फॅट असते. या म्हशीचे संगोपन करून एका वर्षात 1800 ते 2000 लिटर दुधाचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

भदावरी म्हैस:-

चंबळ, बेतवा आणि यमुना नदीलगतच्या भागात आढळणारी भदावरी जात उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासही खूप उपयुक्त आहे. ही जात मुळात उत्तर प्रदेशातील भदावरीमधील आहे. यामुळे या म्हशीच्या जातीला भदावरी म्हणून ओळखले जाते.

याच्या दुधात फॅटचे प्रमाण सर्वाधिक असते आणि त्याच्या दुधापासून मिळणारे तूप पौष्टिकतेने समृद्ध मानले जाते. भदावरी म्हशीचे संगोपन केल्यास वर्षभरात 1600 ते 1800 लिटर दूध उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. निश्चितचं या म्हशीचे पालन करून पशुपालक शेतकरी बांधव बक्कळ पैसा कमवू शकतात.


📢 DAP खताच्या दारामध्ये परत 350 रु वाढ झाली आहे :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!