Tomato Farming in Maharashtra :- एखाद्या व्यक्तीने अवघ्या 15 दिवसांत 2 कोटी कमावले आहेत आणि लवकरच तो आणखी 1 कोटी कमावणार आहे, असे जर तुम्हाला सांगण्यात आले तर तुमचा देखील या
गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे. एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून हा पैसा कमावला आहे. जवळपास 1 महिन्यापासून देशभरात टोमॅटोचे भाव वाढत आहेत.
जूनमध्ये 30 ते 40 रुपयांना मिळणारा टोमॅटो 150 ते 200 रुपयांना विकला जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला पिकाचा बक्कळ नफा मिळाला आहे.
जाणून घ्या कोण आहे हा शेतकरी?
बी महिपाल रेड्डी असे या शेतकऱ्याचे नाव असून ते तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील कौडीपल्ली मंडलातील मोहम्मद नगर गावचे रहिवासी आहेत.
रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेतात अजूनही एक कोटी रुपयांचे टोमॅटोचे पीक शिल्लक आहे. रेड्डी म्हणाले की, ते गावात त्यांच्या 20 एकर
शेतजमिनीवर भातशेती करायचे. भातशेतीत अनेकवेळा नुकसान झाल्यामुळे आठ वर्षांपूर्वी त्यांनी आठ एकरांवर भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली.
महिपाल रेड्डी म्हणाले की ते शेतीमध्ये ठिबक सिंचन आणि ‘स्टेकिंग’ पद्धती वापरतात. ते म्हणाले की जर सर्व काही ठीक झाले तर ते आठवडाभरात त्यांचे सर्व टोमॅटो विकतील.
Tomato Farming in Maharashtra
त्यांनी टोमॅटो हैदराबाद आणि त्याच्या बाहेरील भागात बोयनपल्ली, शाहपूर आणि पटांचेरू मार्केटमध्ये विकले आहेत. त्यांना 25 ते 28 किलोच्या टोमॅटोच्या
क्रेटसाठी 2,500 ते 2,700 रुपये दर मिळाला. त्यांनी सुमारे 7,000 क्रेट सुमारे 2 कोटी रुपयांना विकले आहेत. त्यामुळे सगळीकडे आता त्यांची चर्चा होत आहे.
