Toilet Subsidy In Maharashtra | वैयक्तिक शौचालय साठी ऑनलाईन अर्ज कस भरायचा येथे पहा

Toilet Subsidy In Maharashtra:  या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कुठे भरावा लागतो त्यासाठी कोणते कागदपत्रे तुम्हला लागतील अर्ज अर्ज करण्याची काय प्रोसेस आहे याची सर्व माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

Toilet Subsidy In Maharashtra

स्वच्छता न राखल्यामुळे आजाराने प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढते विशेषतः पावसाळ्यामध्ये खूप आजार होतात.
नागरिकांना याचा खूप त्रास होतो शिवाय दवाखान्यातील खर्च देखील वाढतो अशा वेळी ग्रामीण भागातील नागरिकांनी शौचालय उपयोगात आणले तर रोगराई दूर जाऊ शकते.
ग्रामीण भागामध्ये शौचालयाचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. ग्रामीण भागामध्ये उघड्यावर शौच केली जात असल्याने आजाराची संख्या जास्त वाढते.

शौचालय योजना ऑनलाईन फॉर्म माहिती 

ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शौचालयाचा वापर करावा म्हणून शासनाकडून शौचालयासाठी अनुदान दिले जाते त्यसाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालायाशी संपर्क साधावा लागतो.
शौचालय अनुदान मिळवण्यासाठी तुम्ही अगदी घरी बसून देखील अर्ज करू शकता या संदर्भात म्हणजेच Toilet online form शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म माहिती जाणून घेणार आहोत.

शौचालय योजना ऑनलाईन फॉर्म सादर केल्यास लाभ मिळेल 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरु केलेली आहे.

ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासठी व त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे. या संदर्भातील माहिती शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

शौचालय योजना ऑनलाईन फॉर्मसाठी नोंदणी 

  1. पुढील वेब ॲड्रेस तुमच्या कॉम्पुटर किंवा मोबाईलच्या ब्राउजरच्या सर्च बार मध्ये सर्च करा  https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx किंवा डायरेक्ट पेजवर जाण्यासासाठी येथे क्लिक करा.
  2. जसे हि तुम्ही वरील वेब ॲड्रेस सर्च कराल त्यावेळी तुमच्या कॉम्पुटरवर त्यावेळी स्वच्छ भारत मिशन फेस २ Swachh Bharat Mission (G) – Phase II चा इंटरफेस तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  3. या ठिकाणी तुम्हाला Citizens Registration हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. नोंदणी Registration form ओपन होईल त्यामध्ये पुढील माहिती भरा.
  5.  तुमचा सुरु असलेला मोबाईल नंबर टाका.
  6.  तुमचे नाव टाका.
  7. तुमचे लिंग निवडा.
  8. तुमचा पत्ता टाईप करा.
  9. राज्य निवडा.
  10. दिलेल्या चौकटीमध्ये कॅपचा कोड टाईप करा.
  11. सबमिट करा.
ऑनलाईन अर्जासाठी लॉगीन करा 
  1. लॉगीन या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर टाका
  2. पासवर्डसाठी मोबाईलचे शेवटचे चार अंक टाका.
  3. कॅपचा कोड टाईप करा.
  4. लॉगीन या बटनावर क्लिक करा.
लॉगीन केल्यानंतर भरायची माहिती 

यशस्वी लॉगीन केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा पासवर्ड बदलण्याची सूचना येईल तो बदलून घ्या. स्क्रीनच्या डाव्या बाजूला खालीलप्रमाणे तीन पर्याय दिसतील.

  1. New Application.
  2. View Application.
  3. Change Password.

यापैकी New Application या पर्यायावर क्लिक करा. जसे हि तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या स्क्रीनवर ऑनलाईन अर्ज ओपन होईल आता तुम्हाला खालीलप्रमाणे माहिती त्यामध्ये भरावयाची आहे.

IHHL Aplication form मध्ये खालील माहिती भरा 
  1. State Name मध्ये महाराष्ट्र निवडा.
  2. District साठी तुमचा जिल्हा निवडा.
  3. Block Name या सदरासाठी तुमचा तालुका निवडा.
  4. दिलेल्या यादीमधून तुमची पंचायत निवडा.
  5. तुमचे गाव निवडा.
  6. Select habitation मध्ये तुम्ही जर वाडीवस्तीवर राहत असाल तर ते निवडा किंवा तुमचे गाव निवडा.
ब या सदरासाठी शौचालय मालकाची माहिती 
  1. अर्जदाराचे आधार कार्डनुसार नाव टाईप करा. Name of the application as per Aadhar card.
  2. आधार नंबर टाका आणि तो पडताळून घ्या.
  3. वडील किंवा पतीचे नाव टाका.
  4. अर्जदाराने तो पुरुष आहे किंवा स्त्री आहे तो पर्याय निवडावा.
  5. पोट जात निवडा.
  6. कार्डाचा पर्याय निवडा. या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसतील APL म्हणजेच  Above poverty line व BPL म्हणजे Below poverty line. थोडक्यात APL म्हणजे दारिद्र्य रेषेमध्ये नसलेला आणि BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखालील असलेला. योग्य तो पर्याय निवडा.
  7. मोबाईल नंबर.
  8. इमेल आयडी.
  9. व तुमचा संपूर्ण पत्ता टाईप करा.
अर्जदाराचे बँकेचे तपशील 
  1. बँकेचा IFSC कोड टाका.
  2. जसे हि तुम्ही IFSC कोड टाईप कराल त्यावेळी तुमच्या बँक शाखेचे माहिती आपोपाप खाली आलेली तुम्हाला दिसेल.
  3. तुमचा बँक खाते क्रमांक टाईप करा. खाते क्रमांक परत एकदा टाईप करून खात्री करून घ्या.
  4. सर्वात शेवटी तुमच्या बँक खात्याचे स्कॅन केलेली इमेज अपलोड करा. इमेज अपलोड करतांना लक्षात घ्या कि, साईज केवळ jpg, jpeg, png व pdf format मध्येच असावी. फाईची साईज २०० KB पेक्षा जास्त नसावी.
  5. सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर Apply या बटनावर क्लिक करा.
  6. जसे हि तुम्ही Apply या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमचा अर्ज सादर होईल. Your application submit successfully kindly note the application no. अशी सूचना तुम्हाला दिसेल म्हणजेच तुम्हाला तुमच्या अर्जाचा नंबर प्राप्त होईल जो कि भविष्यामध्ये तुम्हाला गरजेचा असेल.

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!