Thresher Machine Subsidy Best | काय सांगता? मळणी यंत्रासाठी मिळतं एवढं अनुदान; जाणून घ्या योजनाची सविस्तर माहिती 1

Thresher Machine Subsidy: केंद्र शासनाचं एक चांगलं उद्दिष्ट आहे. जे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं. त्यासाठी केंद्रा शासनानं अनेक पावलं उचलली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पारंपारिक शेतीपासून ते शेतीच्या यांत्रिकीकरणाकडे जाणं. यासाठी केंद्रानं कृषी यांत्रिकीकरण अशी योजना शेतकऱ्यांसाठी चालू केली आहे.

Thresher Machine Subsidy

मात्र केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या मागणीच्या प्रमाणामध्ये कृषी अवजारांचा पुरवठा होताना दिसत नाही. तसेच यातून मिळणाऱ्या निधीतही घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये 18 मे 2018 या रोजी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण ही योजना चालू करण्यात आली होती. या योजनेतूनच मळणी यंत्रासाठीही अनुदान देण्यात येतं आहे.

काय आहे योजना 

महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 80% शेतकरी हे अल्प आणि अत्यल्प भूधारक आहे. सहाजिकच त्यांचं उत्पन्नही कमीच आहे. त्यामुळे कमी उत्पन्नामध्ये यंत्रांच्या साहाय्यानं शेती करणं अवघड होत आहे.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी आणि अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेमार्फत 50% अनुदान मिळतं आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळतं आहे. 

एवढं मिळणार अनुदान

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, अनुसूचित जाती (Thresher Machine Subsidy) व जमाती यांना पुढीलप्रमाणे अनुदान देण्यात येतं. 

  • 4 टन प्रति टना पेक्षा जास्त क्षमता असलेल्या व 35 बीएचपी (BHP) पेक्षा जास्त मोठं असलेल्या मळणी यंत्राला 2 लाख 50 हजार रुपये एवढं अनुदान मिळतं.
  • 4 टन प्रती घंट्यापेक्षा कमी क्षमता असलेल्या मळणी यंत्राला 80,000 रुपये एवढं अनुदान दिलं जात आहे.
आवश्यक असणारी कागदपत्रे 
  • आधार कार्ड,
  • 7/12 व 8 अ उतारा,
  • जातीचा दाखला,
  • बँक पासबुक,
  • यंत्राचे कोटेशन,
  • यंत्राचा परीक्षण अहवाल 

Shet Jamin Anudan Yojana

माळनि यंत्र अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

असा करा अर्ज

हा अर्ज महाडीबीटी फार्मर स्कीम या वेबसाईटवर करता येईल. या वेबसाईटवर सुरुवातीला ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडून वैयक्तिक लाभार्थी या पर्यायावर जाऊन हा अर्ज करु शकता.


📢 आता उत्पन्नाचा दाखला काढा घरबसल्या पहा कसा :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment