Thibak Sinchan Yojana Maharashtra | ठिबक सिंचन अनुदानात मोठी वाढ ! नवीन जीआर आला

Thibak Sinchan Yojana Maharashtra | ठिबक सिंचन अनुदानात मोठी वाढ ! नवीन जीआर आला

Thibak Sinchan Yojana Maharashtra

Thibak Sinchan Yojana Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रानो आपण आपल्या शेतात वेगवेगळ्या पद्धतीने पाणी देत असतो. जसे की पहिल्या पासून आपण जसे देत आलोय. त्या प्रकार त्या नंतर आले ठिबक सिंचन व तुषार सिंचन आशा प्रकारच्या पद्धतीने आपण आपल्या पिकांना पाणी देत असतो. पण ज्या वेळी आपल्या विहीर किंवा बोअरवेल ला पाणी कमी पडायला लागते.

आशा वेला शेतकरी हे तुषार किंवा ठिबक सिंचन कडे वळत पण हे ठिबक सिंचन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवल लागत असते. कारण त्यामध्ये पाईप,फिल्टर ठिबक नळी या साऱ्या वस्तू खरेदी साठी आर्थिक भांडवल पाहिजे असते.

आणि याच विचार करता आता शासन शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे. याचा नवीन gr आला आहे. चला तर पाहू की ठिबक सिंचन साठी किती अनुदान मिळणार आहे. त्या साठी हा लेख सविस्तर वाचा.

Thibak Sinchan Yojana Maharashtra

शेतकरी हो ही योजना मागील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये संपूर्ण राज्य भर राबविण्यास परवानगी दिली आहे. योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना म्हणून राबवली जात आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन विकत घेण्यासाठी शासन हे जवळ जवळ 80%अनुदान हे देत आहे. यातच नंतर 2020 मध्ये नवीन मंजुरी देऊन वयक्तिक शेततळे योजनेसाठी 75 हजार रु अनुदान देण्याचा निर्णय घेतला. 

किती टक्के मिळणार अनुदान 

अशा प्रकारच्या बाबींसह राबवली जाणारी ही महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. या योजनेअंतर्गत 2019 पासून शेतकऱ्यांना पूरक अनुदान द्यायला सुरुवात झाली.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान दिलं जातं तर बहुभूधारक शेतकऱ्यांना 45% अनुदान दिलं जातं. आणि या योजनेअंतर्गत पूरक अनुदान म्हणून वरील 30% आणि 25% अनुदान हे या योजनेअंतर्गत दिलं जातं

2019-2020 चं बजेट निघालं परंतु 2020-2021-2022- याचबरोबर 2022- 2023 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबक सिंचन अनुदानाचा लाभ घेतलेला आहे.

परंतु पूरक अनुदान अद्यापही वितरित करण्यात आलेलं नाही. यामध्ये 2020 -21 मध्ये फक्त 199 कोटी रुपये वितरित झाले होते आणि 2021-22 मधील पूर्ण लाभार्थी अजूनही वंचित आहे.

किती कोटी निधी झाला मंजूर

याच पार्श्वभूमीवर या योजनेसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि यापैकी 60% निधीच्या प्रमाणात प्रमाणामध्ये 360 कोटी रुपयांचा निधीसह ही योजना राबवण्यास मंजुरी दिली आहे. आणि यापैकी 165 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. तर काय आहे शासन निर्णय ? कशाप्रकारे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे ? हे आपण जाणून घेउया.

ठिबक सिंचन योजनेचा नवीन GR पाहण्यासठी येथे क्लीक करा 

बाब :- ठिबक सिंचन (1 हेक्टर साठी) लॅटरल अंतर (मी.) 1.2X0.6

खर्च मर्यादा :- 127501 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 1,2001 रुपये
अनुदान :- 75 % नुसार – 95,626 रुपये

2) बाब :- लॅटरल अंतर (मी.) 1.5X1.5

खर्च मर्यादा :- 97,245 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 77,796 रुपये
अनुदान :- 75 % नुसार – 72,934 रुपये

3) बाब :- लॅटरल अंतर (मी.) 5X5

खर्च मर्यादा :- 39,378 रुपये
अनुदान :- 80 % नुसार – 31,502 रुपये
अनुदान :- 75 % नुसार – 29,533 रुपये


📢 नवीन घरकुल योजना अतर्गत मिळतंय 1.20 लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देत आहे 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!