Thet Karj Yojana Maharashtra | थेट कर्ज योजना, 1 लाखापर्यंत कर्ज मिळवा | Thet Karj Yojana Maharashtra 2022

Thet Karj Yojana Maharashtra | थेट कर्ज योजना, 1 लाखापर्यंत कर्ज मिळवा | Thet Karj Yojana Maharashtra 2022

Thet Karj Yojana Maharashtra

Thet Karj Yojana Maharashtra : कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी, पैशाची गरज असते. तर तुमच्यासाठी एक खास योजनेची माहिती घेऊन आलो. ‘थेट कर्ज योजना’ असं योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ घेऊन बेरोजगार तरुण व्यवसाय सुरू करू शकतात.

राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तरुणांनाची बेरोजगारी कमी व्हावी यासाठी ‘थेट कर्ज योजना’ सुरू केली आहे. कर्ज काढून तरुण काहीतरी व्यवसाय करू शकतो. आता तरुणांना व्यवसाय करण्यासाठी योजनेतंर्गत कर्ज मिळणार आहे.

Thet Karj Yojana Maharashtra

‘थेट कर्ज योजने’चा लाभ घेतल्यास 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. या योजनेमुळे तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. (Thet Karj Yojana Maharashtra)

 

Maharashtra Loan Scheme Portal 

महाराष्ट्र शासन कौशल्य विभागाच्या वतीने www.msobcfdc.org हे नवीन पोर्टल सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने www.msobcfdc.org हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलचे उद्घाटन देखील काही दिवसांपूर्वी केले आहे.

राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील युवक व युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी या ऑनलाईन पोर्टलच्या सहाय्याने प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.

 

थेट कर्ज योजना

 • कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येईल.
 • ओबीसी किंवा इतर मागास प्रवर्गातील देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.
 • 18 ते 50 वर्षे वयोगटातील मागास प्रवर्गातील व्यक्ती www.msobcfdc.org या पोर्टलवर ‘थेट कर्ज योजना’ तसेच इतर योजनांचा देखील लाभ घेऊ शकते.

 

पोर्टलवर इतर उपलब्ध असलेल्या योजना 

 • 20 टक्के बीजभांडवल योजना
 • थेट कर्ज योजना 1 लाख रुपयापर्यंत कर्ज
 • वैयक्तिक कर्ज योजना (व्याज परतावा योजना)
 • गट कर्ज (व्याज परतावा योजना)

 

थेट कर्ज योजना तपशील
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही सहभाग भरवायची गरज नाही.
 • अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षांपर्यंत असावे.
 • 500 एवढा सिबिल पात्रता स्कोर असणं आवश्यक आहे.
 • ग्रामीण व शहरी भागातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत असावे.
 • अर्जदाराने जर नियमितपणे 48 समान मासिक हफ्यांमध्ये मुद्दल 2085 रुपये भरल्यास कोणतेही व्याज भरण्याची गरज नाही.
 • नियमित कर्जाची परत केली नाही तरी जेवढे हफ्ते थकीत होतील, त्या सर्व थकीत हप्त्याच्या रक्कमेवर दर साल शेकडा 4 टक्क्यांनी व्याजदर आकारण्यात येईल.
 • तुम्हाला 75 हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळेल.
 • दुसरा 25 हजारांचा हप्ता मिळवण्यासाठी प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे. व्यवसाय सुरू झाल्याच्या 3 महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापक तपासणी केल्या जाईल.

 

थेट कर्ज योजना पात्रता
 • महाराष्ट्राचा रहिवासी असावा व इतर मागासवर्गीय असावा.
 • शासनाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत किंवा निमशासकीय संस्थातून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले असावे.
 • बॅंक खात्याशी आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे.
 • अर्जदार जो व्यवसाय सुरू करत असेल त्या व्यवसायाचे ज्ञान असणं गरजेचे आहे. (Thet Karj Yojana 2022)

 

अर्जासोबत ही कागदपत्रे जोडावी लागणार
 1. रेशन कार्ड
 2. आधार कार्ड
 3. पासपोर्ट साइज फोटो
 4. ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू आहे त्याची भाडे पावती
 5. करारनामा
 6. 7/12 उतारा
 7. जन्माचा दाखला
 8. दोन जमीनदारांचे हमीपत्र
 9. हरकत प्रमाणपत्र
 10. प्रतिज्ञापत्र
 11. तांत्रिक व्यवसायासाठी लागणारे परवानगी प्रत
 12. प्रकल्प अहवाल

 

अर्ज करण्यासाठी येथे संपर्क साधा

दिलेले सर्व कागदपत्रे जमा करून अर्जदाराने आपल्या जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधा.


📢 जमीन खरेदी साठी एसबीआय बँक देते आहे 85% कर्ज :- येथे पहा 

📢 जमीन खरेदी योजना 100% अनुदानावर सुरु 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!