Talathi Bharti Maharashtra 2022 | राज्यात लवकरच 3165 जागांसाठी तलाठी भरती होणार

Talathi Bharti Maharashtra 2022 | राज्यात लवकरच 3165 जागांसाठी तलाठी भरती होणार

Talathi Bharti Maharashtra 2022

Talathi Bharti Maharashtra 2022 : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी व आनंदाची बातमी आहे. राज्यात भरपूर दिवसांपासून तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यामुळे कामाचे नियोजन देखील बिघडले आहे. ही बाब राज्य सरकारने लक्षात घेऊन तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भरतीची तयारी करणाऱ्यांनासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत तलाठी भरतीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, की राज्यात लवकरच तलाठी भरती होणार आहे. राज्यातील 3165 तलाठ्यांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Talathi Bharti Maharashtra 2022

या भरतीसाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ही भरती टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती केल्या जाणार आहे. नंतरची रिक्त पदे पुढील टप्प्यात भरली जाणार आहे. (Talathi Recruitment)

 

तलाठी भरती 2022

बाळासाहेब थोरात म्हणाले, की राज्यात मोठ्या प्रमाणात तलाठ्यांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भरतीमुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील तरुण तलाठी भरतीची वाट पाहत आहे. राज्यात तलाठ्यांच्या 3165 जागा रिक्त आहेत. यामुळे महसूल यंत्रणेवर कामाचा ताण आलेला आहे. यामुळे ही तलाठी भरती लवकरच होणार आहे.

 

Talathi Bharti 2022

गावाचे अर्थकारण तसेच मालमत्त्याचा लेखाजोखा ठेवण्याचे काम हा तलाठी करत असतो. महसूल नोंदी व कर वसूली, सातबारा उतारा देणे, ऑनलाईन असलेली काही कामे, खनिज मध्ये अवैध आढळल्यास कारवाई, ही कामे तलाठी करतो.

संजय गांधी निराधार योजना, निवडणूक, पुरवठा विभाग, पिकांचे पंचनामे तसेच सर्वेक्षणाची काम देखील तलाठी करत असतो. तलाठ्यांना अशी अनेक भरपूर कामे करावी लागतात. एक तलाठी 3 ते 4 गावांचा काम करत असतो. यामुळे कामाचा भार वाढलेला आहे.

भरपूर ठिकाणी 3 ते 4 गावांसाठी एक तलाठी असल्या कारणांमुळे, तलाठ्यांना काम जास्त झालेली आहे. तलाठ्यांची कामे वाढल्याने काही नागरिकांचे कामे तसेच राहतात. तसेच सरकारी योजनेपासून नागरिक वंचित राहतात. (Talathi Bharti 2022 Notification)

राज्यात तलाठ्यांची गरज असल्या कारणांमुळे, लवकरच तलाठी भरती होणार आहे. ही भरती कोणत्या महिन्यात होईल हे सांगितले नाही. परंतु, यावर्षी तलाठी भरती होऊ शकते. तुम्ही देखील तलाठी भरतीच्या तयारीला लागा. ही माहिती तरुणांसाठी महत्वाची आहे. पुढे देखील नक्की शेअर करा.


📢 कडबा कुतीई मशीन साठी मिळतंय 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!