Steel Rate Today Best | घरकामात लागणाऱ्या स्टील चे भाव काय आहेत पहा ! सविस्तर भाव 1

Steel Rate Today: घरबांधणीसाठी लागणाऱ्या स्टीलचे भाव सहा महिन्यांत दुपटीने वाढून, तब्बल ८६ हजारांच्या वर पोचले होते. मात्र, या महिन्याभरात स्टीलच्या दरात १० टक्क्यांची घसरण झाली आहे.

लोखंडी सळईचा भाव सध्या प्रतीटन ७६ ते ७८ हजारांपर्यंत खाली आल्याने बांधकाम व्यावसायिकांसह आपले (Steel Rate Today) घर बांधणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Steel Rate Today

मागील वर्षभरापासून बांधकाम साहित्याच्या दरात सातत्याने वाढ सुरू होती. अगदी वाळू, विटा, सिमेंट, खळीसह कुशल, अकुशल कामगारांची मजुरी वाढल्याने एकूणच बांधकाम क्षेत्रावर याचा परिणाम झाला होता.

त्यातच घरबांधणीसाठी लागणाऱ्या लोखंडाचे दर दुपटीने वाढल्याने बांधकाम व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले होते. याच कारणाने १ एप्रिलपासून नविन बांधकामाचे दर २५ टक्यांनी वाढून देण्याची मागणी करत बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने सुरू असलेली बांधकामे थांबविली होती.

शेती विषयक माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करा

लोखंडाचे भाव 

दरम्यान, या महिन्याभरात स्टीलचे दर घसरल्याने बांधकाम व्यावसायिकांसह खासगी बांधकाम करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी लोखंडी सळईचा ५० ते ५५ हजार रुपये टन भाव होता. रशिया युक्रेन युद्धामुळे दरवाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यांत ६ ते ३२ एमएम स्टीलचे दर प्रति टन तब्बल ८६ हजारांवर पोचले होते.

आता ७६ हजारापर्यंत खाली आले आहेत. याबाबत स्टील व्यापारी जीवन पाटणी म्हणाले, कच्या • मालाची उपलब्धता वाढल्याने स्टीलचे भाव टनामागे ८ ते १० हजारांनी कमी झाले आहेत. लोखंडी सळईचे भाव ८५ ते ८६ हजारावर गेले होते. ते आता ७६ ते ७८ 1 हजारापर्यंत खाली आले आहेत,


📢 आपले जन्म प्रमाणपत्र काढा घरबसल्या ऑनलाईन :- येथे पहा  

📢 कंदाचाळ योजनेचे या जिल्ह्यांसाठी नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment