Start Business In India: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज एक अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहे की त्या व्यवसायात वीस पट फायदा मिळतो. सध्याला शेतकरी शेतीमध्ये खर्च कमी करून उत्पन्न जास्त मिळवण्याकडे लक्ष देत आहेत. तर आज आपण अशाच शेती बद्दल जाणून घेणार आहोत. तर ती शेती आहे लेमन ग्रास शेती मित्रांनो यामध्ये तुम्ही कमी खर्चामध्ये अधिक मुनाफा कमवू शकता.
Start Business In India
लेमन ग्रास ही एक औषधी वनस्पती आहे त्यामुळे त्याला बाजारात चांगली मागणी आहे. मित्रांनो लेमन ग्रास सुरुवातीला कापले तर त्यातून हेक्टरी जवळजवळ 25 किलो तेल तयार करतात आणखीन जर दुसऱ्यांदा कापलं
तर त्यातून 70 किलो जवळपास तेल काढला जातो. मित्रांनो या पिकाचे प्रत्येक वेळी कापताना उत्पन्न वाढत जाते. या तेलाची बाजारात किंमत बाराशे ते पंधराशे रुपये लिटर आहे.
लेमन ग्रास पासून सुगंधी प्रॉडक्ट
मित्रांनो लेमन ग्रास पासून सुगंधी प्रॉडक्ट तयार केले जातात. आणि लेमनग्रास ही एक औषधी वनस्पती आहे लेमन ग्रास या वनस्पतीत औषधी गुणधर्म आहेत. त्याने या पिकाला कोणतेही रोग येत नाही याला बाजारात मोठी मागणी आहे.
म्हणून लेमन ग्रास या पिकापासून (Start Business In India) आपण चांगला नफा कमवू शकतो. आणि मित्रांनो झारखंड येथील विष्णुपुरी येथे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये लेमन ग्रास करणाऱ्या तीस लोकांच्या समूहाचे कौतुक सुद्धा केले आहे.
20 हजार रुपयात सुरू करा हा व्यवसाय
शेतकरी मित्रांनो वीस हजार रुपये खर्च करून तुम्ही लेमन ग्रास ची शेती करू शकता, लेमन ग्रास ची शेती करण्यासाठी बागायती जमीन असणे आवश्यक आहे मित्रांनो यासाठी पडीक जमीन असली तरी जमते त्या जमिनीला सुपीक सुद्धा करण्याची गरज नाही.
येथे तुमचा खर्च चांगला वाचू शकतो. लेमन ग्रास ची एकता लागवड केली त्यानंतर चार ते सहा वेळेस याचे उत्पादन घेऊ शकता मित्रांनो या पिकापासून सहा वर्षात चार ते पाच लाख रुपये चा नफा मिळू शकतो, मित्रांनो म्हणून या शेतीतून चांगला नफा कमवू शकता.