SSC Result 2022 | दहावीचा निकाल 'या' दिवशी लागणार, असा चेक करा निकाल

SSC Result 2022 | दहावीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार, असा चेक करा निकाल

SSC Result 2022

SSC Result 2022: बारावीचा निकाल आत्ताच काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला.. आता दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचं निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचे सांगितले होते.

SSC Result 2022

कोरोना काळात 2 वर्षांपासून परीक्षेचा काही एवढा मेळ नव्हता. यंदा परीक्षा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. परंतु, अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात आला. अशा अनेक संकटांवर मात करून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली.

SSC Result 2022 Date Maharashtra

दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी रोल नंबर आणि आईच्या नावाची माहिती देऊन दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड पालन अनुदान योजना 2022 सुरु 

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख विद्यार्थी बसलेले होते. आता या 16 लाख विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 15 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.

दहावीचा निकाल ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हा निकाल तुम्ही ऑनलाईन कसा पाहायचा जाणून घेऊया. (SSC Result 2022 Maharashtra Board)

असा पहा दहावीचा निकाल ऑनलाईन

 • सर्वात अगोदर http://mahresult.nic.in/ ही वेबसाईट उघडा.
 • होमपेजवर आल्यानंतर, दहावीचा निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
 • यानंतर, तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
 • ही माहिती टाकल्यानंतर, ‘निकाल पहा’ या बटणावर क्लिक करा.
 • दहावीचा निकाल तुमच्यासमोर ओपन होईल.
 • या निकालाची तुम्ही प्रिंट काढून ठेवा किंवा मोबाईलमध्ये PDF म्हणून सेव्ह करून ठेवा.
10वी च्या विद्यार्थ्यांनासाठी महत्वपूर्ण बाबी
 • महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे सीट नंबर असतात.
 • निकाल पाहण्यासाठी रोल नंबर आणि आईच्या नावाची गरज असते.
 • रोल नंबर चुकल्यास, आईच्या नावाने देखील निकाल चेक करता येईल.
 • जर आईचे नाव चुकल्यास, रोल नंबरवरून निकाल चेक करता येईल.
 • महाराष्ट्र बोर्डाची दहावीच्या निकालाची वेबसाइट माहित असणं आवश्यक आहे. (10th Result 2022 Maharashtra Board)

हेही वाचा :- कुकुट पालन साठी मिळतंय 75% अनुदान आजच करा अर्ज 

गेल्या वर्षी दहावीचा निकाल कोरोना काळामुळे 16 जुलै 2021 रोजी जाहीर झाला होता. यंदा 15 जूनपर्यंत दहावीचा निकाल लागेल, अशी सुत्रांकडून माहिती मिळालेली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दहावीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर करतील.

दहावीचा निकाल लागल्यानंतर, 11वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरू होते. ही बाब शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. नोंदणीचा एक भाग भरण्यास सुरुवात झालेली आहे. नोंदणीच्या दुसऱ्या भागाला दहावीचा निकाल लागल्यानंतर सुरूवात होईल.


📢 दुधाला मिळणार हमी भाव शासनाचा नवीन GR आला :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 सुरु आजच घ्या लाभ :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!