Soybean Yellow Mosaic Virus | सोयाबीन पिवळी पडत आहे का ? असे करा व्यवस्थापन

Soybean Yellow Mosaic Virus | सोयाबीन पिवळी पडत आहे का ? असे करा व्यवस्थापन

Soybean Yellow Mosaic Virus

Soybean Yellow Mosaic Virus: लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये ‘क्लोरोसिस’ लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे, अशी माहिती देत सदर प्रकरणी शेतकऱ्यांनी वेळीच व्यवस्थापन करावे, असे आवाहन ‘वनामकृवि’ च्या तज्ञांनी केले आहे.

सोयाबीन पिवळे पडण्यांची लक्षणे लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरां फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात.

Soybean Yellow Mosaic Virus

कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्याने हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

लोह ची कमतरता विशेषतः कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरव्या रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते.

हेही वाचा : ड्रोन खरेदी साठी शेतकऱ्यांना शासन देते 100% अनुदान येथे करा अर्ज 

सोयाबीन पिवळी का पडते 

तथापी, बऱ्याचदा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो. आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते. या संदर्भात व्यवस्थापनात शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी.

०.५ टक्के (५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) फेरस सल्फेटची पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चिलेटेड मिक्स. मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (क्क) ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. असे आवाहन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ञांनी केले आहे.

पिकात तणाची वाढ
दि. ८ जुलै पासून सतत पाऊसाची झड असल्याने शेतक-यांना शेती कोळपणे, तन काढणे, तन नाशक फवारणी करणे आवघड झाले आहे. सर्वात कमि प्रमाणात पाऊस असला तरीही जंनतेला घराबाहेर पडणे आवघड झाल्याने शेती कामे करणे अशक्य झाले आहे.

हेही वाचा : आता ई पिक पाहणी केल्या शिवाय नाही भरता येणार नाही 

पावसाच्या झडीमुळे तणाची वाढ झपाट्याने होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गेल्या ३ वर्षापासून सततच्या अतिवृष्टीने पिकांची नुकसानीमुळे उत्पनात घट होत असल्यामुळे शेतक-यांच्या माथी कर्जाचा डोंगर पडत आहे.

पेरणी झाल्या नंतर मोडाची उगवन चांगल्या प्रमाणात झाली. मात्र त्यावर गोगलगाय व वाणी पैसा किड्याने आट्याक केल्यामुळे मोडाची जास्तीच्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंकटामुळे शेतकरी यावर्षाची शेतातील उत्पन्न होईल की नाही या विवेचनात आहे.


📢 नवीन घरकुल योजना 2022 साठी 1.२ लाख रु मिळणार अनुदान :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!