Soyabean Tan Nashak Fawarni | सोयाबीन लागवडीच्या वेळी वापर हे तणनाशक

Soyabean Tan Nashak Fawarni | सोयाबीन लागवडीच्या वेळी वापर हे तणनाशक

Soyabean Tan Nashak Fawarni

Soyabean Tan Nashak Fawarni : नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. की कारण आता पावसाळा आला आहे शेतकऱ्यांच्या पेरण्या चालू आहे. त्यात शेतकरी हे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड करत असतात.

पण पावसाळा असल्यामुळे शेतामध्ये खूप तण हे युगात असते त्यासाठी शेतकरी हे वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके वापरात असतात. या संधार्भात ही माहिती आहे ही तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर सोयाबीन लागवड आधी कोणते तणनाशक वापरावे.

Soyabean Tan Nashak Fawarni

सोयाबीन चि पेरणी/लागवड देशात तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते.मागिल दोन वर्षापासून सोयाबीन ला भाव सुद्धा चांगला मिळत असल्याने शेतकर्याचा सोयाबीन पिकाकडे कल जास्त दिसत आहे.

सोयाबीन चे चांगले उत्पादन घेण्यासाठी जमिनीची पुर्वमशागत, वेळेवर पेरणी,योग्य वानाची निवड,खत व्यवस्थापन,तन व्यवस्थापन या गोष्टिकडे ध्यान देने गरजेचे असते. तर आपण या लेखात सोयाबीन चे तननाशकाची माहिती घेनार आहोत.

सोयाबीनच्या तन नाशकामधे दोन प्रकार पडतात.
1) पेरणी केली लगेच 72 तासाच्या आत फवारणी करणे.
2) सोयाबीन 22 ते 25 दिवसाचा झाल्यानंतर फवारणी करणे.

पहिल्या प्रकारामधे सोयाबीन ची पेरणी झाली की लगेच 72 तासाच्या आत फवारणी करून तनव्यवस्थापन करता येते. यामधे कोनत्या तननाशकाची फवारणी करता येते ते पाहुया :

१) डुपाँन्ड चे स्ट्राँगआर्म

डुपाँन्ड चे स्ट्राँगआर्म या रिझर्ट खुप चांगले आहेत.याचे प्रमाण एक एकरसाठी 12.4 gm ची पँकींग वापरावी. या पँकींग ची एक एकरसाठी 10 पंप करणे आवश्यक आहे. फवारणी करताना जमीन ओली असणे खुप महत्वाचे असते. जमीन ओली नसल्यावर 100 % फायदा होत नाही .

2) BASF-volor 32
यामधे ( pendimethalin 30% +Imazethapyr 2% EC ) हा घटक असतो.याचे सोयाबीन साठी एकरी एक लिटर तर मुगासाठी 800ml तर हरबर्यासाठी 500 ml प्रमाण असते. 50 ते 60 दिवस तनावर नियंत्रण करते.फवारणी करताना प्रमाणापेक्षा जास्त मात्रा घेउ नये.नाहितर पिकावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

3) Authority
यामधे (sulfentrazone 28 % +clomazone 30 % wp)
हा घटक असुन याची मात्रा एक एकरसाठी 500 gm आहे.200 लिटर पाण्यामधे मिसळुन याची फवारणी करावी. पेरणीनंतर 48 तासाच्या आत याची फवारणी करावी.याच्या फवारणी नंतर 40 दिवस पर्यत तन नियंत्रन होते.

तर सोयाबीन पेरणीनंतर  15ते 20 दिवसाचे झाल्यावर कोनते तननाशक वापरावे ते पाहूया ;

1) Sijenta fusiflex ( सिजेन्त्ता फुसीफ्लेकस् )

Sijenta fusiflex यामधे fomesafon11.1% +fluazifop-p-butyl 11.1% sl हा घटक आहे. सोयाबीन साठी याची मात्रा एक एकरसाठी 400ml औषधा 150 लिटर पाण्यामधे मिसळुन फवारणी करावी. 15 लिटर पाण्यामधे 40 ml औषध वाफरावे.

चार ते पाच दिवसात हे संंपुर्ण गवताचा नाश करते. गवत चार ते पाच पानावर आसताना याची फवारणी करावी,नाहितर सोयाबीन 20-25 दिवसाची झाल्यावर याची फवारणी करावी.

काही शेतकरी तननाशका सोबत किटकनाशक सुद्धा फवारणी करतात,तर यासोबत कोनत्याही किटकनाशकाची किंवा टाँनिकची फवारणी करु नये.

फवारणी करताना जमीनीत ओलावा असने खुप गरजेचे आहे. ओलावा नसेल तर याच्या रिझल्ट मधे फरक पडु शकतो. सोयाबीन मधे 20 ते 25 दिवसाच्या आतमधे याची फवारणी करावी.

2) Sadana saket : ( आदमा साकेत )

या औषधामधे propaquuizafop 2.5% + imazetthapyr 3.75% w/w ME हा घटक आहे. याचा वापर फक्त सोयाबीन साठी करावा. याची फवारणी पेरणीनंतर 18-22 दिवसाच्या दरम्यान करावी लागते. गवत चार ते पाच पानावर आसताना याची फवारणी करावी.

आदामाचे साकेत ची फवारणी ची मात्रा 15 लिटर पाण्यामधे 80 ml तर एक एकरसाठी 180-200 लिटर पाण्यामधे 800 ml मिसळुन फवारणी करावी. याच्यासोबत मेन बुस्ट 300 gm चि सुद्धा फवारणी करावी.

आदामाचे साकेत चि फवारणी करण्यासाठी जमीनीत ओलावा असने खुप गरजेचे आहे. सोयाबीन मधिल तननाशका साठी आदामाचे साकेत खुप चांगले आहे. तर सोयाबीन 15ते 20 दिवसाचे झाल्यावर कोनते तननाशक वापरावे.

वरील संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर आपणास विनंती आहे की आपण आपल्या जवळील कृषी सेवा केंद्र मध्ये जाऊन या तन नाशक कसे वापरावे किंवा इतर नाशके  वापरावे का या संदर्भात माहिती नक्की जाणून घ्या त्यानंतर फवारणी करावी ही फक्त या तननाशक विषयी माहिती देण्यात आलेली आहे तर आपण आपल्या जवळील कृषी सेवा केंद्र यांना भेट देऊन तिथून माहिती जाणून घ्यावी


📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 जुने सातबारा उतारा किवा फेर फार कसे पाहावे :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!