Soyabean Cotton Market Rate Best | शेतकरी हो येथे पहा सोयाबीन व कापूस विकण्याची योग्य वेळ कोणती 1

Soyabean Cotton Market Rate: त्यामुळे सध्याचा मार्केटचा ट्रेंड काय सांगत आहे? सध्या सोयाबीन आणि कापसाला किती दर मिळत आहे? तसंच यंदा सोयाबीन-कापूस विकण्याची योग्य वेळ कोणती असू शकते? या प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

यंदा सोयाबीनचं जागतिक उत्पादन चांगलं असल्यानं आणि सोयाबीनचा सध्याचा दर पाहिल्यास सोयाबीनला प्रती क्विंटल 5,500 रुपयांहून अधिक दर मिळण्याची शक्यता कमी दिसतेय, असं मत शेतमाल बाजारभावाचे अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Soyabean Cotton Market Rate

यंदा सोयाबीनचं जागतिक उत्पादन चांगलं आहे. ते सोयाबीनच्या मागणीपेक्षा जास्त आहे. ज्यावेळी मागणीपेक्षा उत्पादन जास्त असतं, त्यावेळी शेतमालाचे दर खालावत जातात.

“यंदा सोयाबीनच्या दराची रेंज प्रती क्विंटल 5,000 ते 5,800 रुपये राहण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतकऱ्यानं 5 हजारांच्या खाली सोयाबीन विकायचं नाही आणि 5,,600 ते 5700 च्या वरती दर गेल्यास ते टप्याटप्यात ते विकलं पाहिजे,” असाही अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Soyabean Cotton Market Rate

सोयाबीनच्या दरात महिन्याभरात किती वाढ?

भारत सरकारच्या agmarknet या वेबसाईटवर दररोज देशभरातल्या बाजारपेठांमधील शेतमालाचे दर नोंदवले जातात.

नोव्हेंबर 2022ची आकडेवारी पाहिल्यास, या महिन्यात सोयाबीन या शेतमालाला देशभरात सरासरी 5,543 रुपये प्रती क्विंटल इतका दर मिळत आहे.

गेल्या महिन्यात हा दर 5,085 रुपये इतका होता. म्हणजे देशभरातील सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केल्यास गेल्या एका महिन्यात सोयाबीनचा दर 458 रुपयांनी वाढला आहे.

महाराष्ट्राचा विचार केल्यास, नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनला प्रती क्विंटल सरासरी 5,281 रुपये दर मिळत आहे.

ऑक्टोबरमध्ये (Soyabean Cotton Market Rate) हा दर 4,721 रुपये इतका होता. याचा अर्थ महाराष्ट्रात गेल्या एका महिन्यात सोयाबीनच्या दरात 560 रुपयांनी वाढ झाली आहे.

कापसाच्या दरात कितीनं वाढ?

नोव्हेंबर 2022मध्ये कापसाला देशभरात सरासरी 8,577 रुपये प्रती क्विंटल इतका दर मिळत आहे.

गेल्या महिन्यात हा दर 7,989 रुपये इतका होता. म्हणजे देशभरातील कापसाच्या बाजारभावाचा विचार केल्यास गेल्या एका महिन्यात कापसाचा दर 588 रुपयांनी वाढला आहे.

महाराष्ट्राचा विचार केल्यास, नोव्हेंबर महिन्यात कापसाला प्रती क्विंटल सरासरी 8,769 रुपये दर मिळत आहे.

ऑक्टोबरमध्ये हा दर 7,820 रुपये इतका होता. याचा अर्थ महाराष्ट्रात गेल्या एका महिन्यात कापसाच्या दरात 949 रुपयांनी वाढ झाली आहे.

सोयाबीन-कापूस कधी विकावा?

सोयाबीन आणि कापसाचे सरासरी दर गेल्या महिन्याभरात वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मग वाढत्या दराचा हा ट्रेंड असाच कायम राहू शकतो का? तसं असेल तर शेतकरी (Soyabean Cotton Market Rate) किती दिवस हा शेतमाल साठवून ठेवू शकतो आणि कधी तो विकू शकतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

Leave a Comment

close button
error: Content is protected !!