Solar Pump Yojana देशात वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये आता वीज बिलातही सातत्याने वाढ होत आहे. वाढलेले विजेचे दर आणि त्यामुळे येणारे अधिकचे वीज बील सामान्य नागरिकांनाच नाहीतर शेतकऱ्यांना देखील अधिकच अडचणीत आणत आहे. यावर आता पर्याय म्हणून शेतीत सौर ऊर्जेच्या माध्यमातून पिकाला पाणी देऊ शकतात.
Solar Pump Yojana
शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या (Agricultural Pump) साहाय्याने दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे. यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतामध्ये सोलर पंप बसवू शकतात. शेतकरी आता या सौर कृषी पंपाने पिकाला पाणी देऊन पिकाला जीवनदान देत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन काढत आहेत.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
डिसेंबर 2020 मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. योजनेंतर्गत बरेच प्रोजेक्ट देखील उभा राहिलेले आहेत.
राज्यामध्ये शेतकऱ्यांना 8 तास दिवसा विजेचा पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला एक लाखाचा टप्पा दिला होता. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
पीएम कुसुम योजना
पीएम कुसुम योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. याशिवाय शेतकरी 30 टक्के बँकेतूनही कर्ज (Bank Loan) घेऊ शकतात.
सोलर पंप योजनेचे अर्ज कसा करायचा येथे पहा
अशा परिस्थितीत या पैशातून शेतकरी आपल्या जमिनीवर सोलर पॅनल बसवू शकतात. आणि यामुळे पिकाला चांगले पाणी देता येते. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाद्वारे तुम्ही फक्त 20 हजार (Solar Pump Yojana) रुपयांमध्ये शेतात हा सोलर कृषी पंप बसू शकता.
📢 आपल्या जमिनीच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे आणि नोटीस पहा आपल्या मोबाईलवर :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा