Solar Fencing Subsidy Maharashtra | सौर कुंपण योजना 75% अनुदानावर सुरु ! शासन निर्णय आला

Solar Fencing Subsidy Maharashtra | सौर कुंपण योजना 75% अनुदानावर सुरु ! शासन निर्णय आला

Solar Fencing Subsidy Maharashtra

Solar Fencing Subsidy Maharashtra : श्यामाप्रसाद मुखर्जी जनवणे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावरती सौर कुंपण दिले जाणार आहे.

आणि याच संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेलाआहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातूनसौर कुंपण योजना कशा प्रकारे राबवले जाणार आहे. यासंदर्भात लाभार्थ्यांना अनुदान किती दिला जाणार आहे.

याची सर्व अंमलबजावणीची प्रक्रिया कशी असणार आहे. या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण या आधी एक अपडेट घेतल होत. त्या अपडेट मध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना शेती पिकांचे संरक्षण करण्याकरता वन्य प्राण्या पासून होणारे नुकसान टाळण्याकरिता.

श्यामाप्रसाद मुखर्जी जनधन योजना या योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदानावर किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये. अशा प्रकारच्या अनुदानावर ते सौर कुंपण देण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती.

मंजुरी मिळाल्यानंतर यांच्या संबंधातील शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर योजना कशा प्रकारे राबविली जाईल आणि स्पष्ट होणार होता.

Solar Fencing Subsidy Maharashtra

याच संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले यांच्यासंदर्भातील 25 मे 2022 रोजी पाहू शकता. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी विकास योजनेची व्याप्ती वाढून त्याच्या अंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाचे बाब समाविष्ट करण्याबाबत प्रस्ताव पाहू शकता. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत राबवली जाणार आहे.

jan van yojana 2022 maharashtra

गावातील नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत विकास साधून त्यांची उत्पादकता वाढविणे, गावक-यांचीवनावरील निर्भरता कमी करणे, शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करणे, पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देणे.गावक-यांच्या सहभागातून वन आणि वन्यजीवांचे संरक्षण तसेच वन व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे व या.

माध्यमातून मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील बफर व वन्यजीव संरक्षित क्षेत्राच्यासीमेच्या २ कि.मी. आतील. संवेदनशील गावांमध्ये संदर्भ-१ च्या शासन निर्णयानुसार डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरु करण्यात आली.

सौर कुंपण योजना 2022

या योजनेस गावक-यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून सदर योजनेची व्याप्ती वाढवून वन्यप्राणी भ्रमणमार्गातील गावे, ग्रामवन असलेली गावे. व संरक्षित क्षेत्रामधून पुर्नवसीत गावे यांचा सदर योजनेत संदर्भ क्र. २ चे शासन निर्णयानुसार समावेश करण्यात आला.

सदर योजने अंतर्गत वनाशेजारील गावातील १००%. कुटुंबांना स्वयंपाक गॅस (LPG) पुरवठा करण्याची अतिरिक्त बाब संदर्भ क्र. ३ चे शासन निर्णयानुसार समाविष्ट करण्यात आली.

तद्नंतर, संदर्भ क्र. ४ व ५ चे शासन निर्णयानुसार सदर योजने अंतर्गत वन्यप्राण्यांकडून शेत. पिकाची नुकसानी थांबविण्यासाठी सामुहीक चेनलिंक फेन्सिंग ही बाब समाविष्ट करण्यात आली.

मागील काही वर्षात नवेगांव-नागझिरा व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्राचे गावातील शेतकरी लाभार्थींना प्रायोगिक तत्वावर व्यक्तीगत सौर ऊर्जा कुंपण देण्यात आले.

सदर प्रयोगाचे अवलोकन केले असता सौर ऊर्जा कुंपणाची किंमत लोखंडी जाळीच्या कुंपणाच्या तुलनेत अत्यल्प आहे, तसेचवन्यप्राण्यांना इजा होण्याची शक्यता कमी आहे आणि हंगाम संपल्यानंतर कुंपण काढून ठेवणे शक्य आहे

jan van yojana 2022 maharashtra

जेणेकरुन वन्यप्राणी भ्रमणमार्ग पुनश्च सुरळीत होतात. अशा विविध कारणांमुळे सौर कुंपणाचे प्रत्यक्षात फायदे जास्त असून त्याची स्वीकार्यता वाढलेली आहे.

सदरचे अनुभवामुळे व्यक्तीगत सौर ऊर्जा कुंपण देण्याबाबतडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत विशेष तरतूद असावी अशी मागणी पुढे येत आहे.

लोखंडी जाळीचे कुंपणाचे योजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद, त्याकरिता लागणारा निधी व लोखंडी जाळीचे कुंपणाच्या तुलनेत सौर ऊर्जा कुंपणाची उपयुक्तता या सर्व बाबींचा विचार करुन.

संवेदनशील गावांमध्ये डॉ. श्यामाप्रासाद मुखर्जी जन-वन विकास योजने अंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाची बाब
समाविष्ट करणे शासनाचे विचाराधीन होते. त्याअनुषंगाने आता शासन खालीलप्रमाणे निर्णय (Solar Fencing Subsidy Maharashtra) घेत आहे.

शासन निर्णय :-

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजने अंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट करणे:- सौर ऊर्जा कुंपणाकरीता लाभाचे स्वरुप :- संवेदनशील गावांमध्ये सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ वैयक्तिकरित्या देण्यात येईल. निश्चित केलेल्या मापदंडाचे सौर ऊर्जा कुंपण साहित्याचा पुरवठा लाभार्थ्यास

solar subsidy in maharashtra 2022

करण्यात येईल. याकरीता प्रतिलाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या ७५% किंवा रूपये १५,०००/- या पैकी जी कमी असेल त्या रक्कमेचे अनुदान देण्यात येईल. सौर ऊर्जा साहित्याच्या किंमतीच्या अनुषंगाने उर्वरीत २५% किंवा अधिकच्या रक्कमेचा वाटा लाभार्थ्याचा राहील.
कार्यान्वयीन यंत्रणा :- दिनांक ०४.०८.२०१५ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद २.०१ मध्ये नमूद

केलेप्रमाणे सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्याची कार्यवाही ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत राबविण्यात येईल. ज्या गावात ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समिती अस्तित्वात नसेल तेथे समिती गठीत करावी.

 

लाभार्थ्यांचे निवडीचे निकष 

१. सदर लाभार्थीकडे गावातील शेतीचा ७/१२, गाव नमुना ८ अथवा वनहक्क कायदा अंतर्गत पट्टा वाटप केल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील.
२. लाभार्थी हा गावातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. तथापि, एखाद्या व्यक्तीकडे मुद्या क्र. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दस्तऐवज असल्यास त्यास ही अट लागू राहणार नाही.
३. ज्या व्यक्तीवर वनगुन्हा नोंदविण्यात आला असेल अशा व्यक्तीस योजनेचा लाभ देय असणार नाही. तथापि, एखाद्या व्यक्तीवर वाटप झालेल्या वनपट्टयासंदर्भात अतिक्रमणाचा गुन्हा नोंदविला गेला असेल त्यास सदर योजनेचा लाभ देय राहील.
४. या योजने अंतर्गत वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण अथवा सामुहिक चेन लिंक फेन्सिंग यापैकी एकच लाभअनुज्ञेय राहील. 

लाभार्थी निवड करण्याची कार्यपध्दती

१. संवेदनशील गावाची निवड झाल्यावर ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समिती आवश्यक माहिती ग्रामपंचायत सुचनाफलकावर प्रसिध्द करावी.२. अर्जदारांनी सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांचेकडे अर्ज करणे आवश्यक राहील.
३. ग्राम परिस्थितीकीय विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीने अर्जदारांची पात्रता निश्चित केल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्फत उपवनसंरक्षक यांचेकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा.


📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% मिळणार अनुदान :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा  

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!