Smam Kisan Yojana | शेती उपकरणांसाठी मिळणार 80 टक्के अनुदान, केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी 'असा' करा अर्ज

Smam Kisan Yojana | शेती उपकरणांसाठी मिळणार 80 टक्के अनुदान, केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘असा’ करा अर्ज

Smam Kisan Yojana

Smam Kisan Yojana: भारत मोठ्या प्रमाणात शेती केल्या जात असल्यामुळे, भारताला कृषीप्रधान देश म्हटल्या जाते. भारताच्या विकासात 17 ते 18 टक्के जीडीपी कृषी क्षेत्रातून मिळते. सरकार देखील शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या जीवन सुखी व्हावे, यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबविण्यात येत असतात.

Smam Kisan Yojana

सरकार योजनेद्वारे शेतकऱ्यांना कमी किंमतीत बियाणे, खते, शेतीसाठी लागणारी उपयुक्त उपकरणे पुरवली जाते. शेतकऱ्यांना केंद्र सरकाराच्या योजनेअंतर्गत कृषी उपकरणांसाठी सवलत दिल्या जात आहे. तर या योजनेचे नाव ‘स्माम किसान योजना’ असं आहे. (Smam Scheme) या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..

स्माम किसान योजने’चा लाभ

देशातील सर्व शेतकऱ्यांना ‘स्माम किसान योजने’चा लाभ घेता येईल. महिला शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.. यासाठी फक्त शेतीचा सातबारा उतारा तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे. शेतीसाठी वापरणाऱ्या आधुनिक उपकरणांसाठी या योजनेतंर्गत केंद्र सरकारकडून 50 ते 80 टक्यांपर्यंत अनुदान दिल्या जाते..

हेही वाचा : प्रधानमंत्री मुद्रा योजने अतर्गत व्यवसाय सुरु करण्यासठी मिळवा 10 लाख रु कर्ज 

शेती उपकरणांच्या किंमती शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर असल्याने, शेतकऱ्यांना महागडी उपकरणे शेती करणं शक्य नाही. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे कृषी उपकरणे घेणं आता सोपं झालं आहे. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणांमुळे शेती करणं देखील सोपं होऊन जाईल. (Smam Scheme Maharashtra)

स्माम किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2. वास्तव्याचे प्रमाणपत्र
 3. सातबारा व 8अ उतारा
 4. बॅक पासबुक
 5. मोबाईल नंबर
 6. जातीचा दाखला
 7. पासपोर्ट फोटो
योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘असा’ करा अर्ज..
 • सर्वप्रथम पुढील https://agrimachinery.nic.in/ या वेबसाईटवर जा.
 • वेबसाईटवर आल्यानंतर ‘Registration’ ऑप्शनवर क्लिक करा.
 • येथे ‘फॉर्मर’ ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • या पेजवर तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
 • येथे नाव, आधार क्रमांक टाकून घ्या.
 • त्यानंतर तुम्हाला अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरावी लागेल.
 • शेवटी, सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा. तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. (Smam Kisan Yojana 2022 Apply Online)

स्माम किसान योजने’चा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा 

तर अशाप्रकारे ‘स्माम किसान योजने’चा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना कृषी उपकरणांवर चांगली सवलत दिल्या जाणार आहे. कृषी उपकरणांनद्वारे शेती करणं सोपं व सोयीस्कर होईल. केंद्र सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे.


📢 शेतातील उंदीर पिकाची नुकसान करत आहे तर हे करा उपाय :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!