Shirohi Sheli Palan Best | मित्रानो आता शिरोही जातीची शेली पाळा हि शेली पालन साठी आहे सर्वात उत्कृष्ट शेळी पहा सविस्तर माहिती 1

Shirohi Sheli Palan: मित्रानो शेळीपालनाच्या व्यवसायामध्ये सुद्धा आता अनेक नवनवी प्रकारचे तकनीकी आल्यामुळे अनेक शिकलेली तरुण मुल सुद्धा व्यवसायाकडे वळत आहेत मित्रांनो हा व्यवसाय सध्याला मोठ्या प्रमाणात केला जातो, कारण या व्यवसायात इतर व्यवसायाच्या तुलनेन खर्च कमी लागतो आणि मित्रांनो या हा व्यवसाय कमीत कमी जागे मध्ये होतो.

Shirohi Sheli Palan

मित्रानो शेळीपालन करण्यासाठीं शेळ्यांच्या जात चांगली निवडणे  यावर देखील तुमच्या व्यवसायावर फरक पडू शकतो त्यामुळं दर्जेदार व चांगल्या जातींची निवड शेळीपालनासाठी करणे खूप महत्त्वाचे असते. मित्रानो जर आपण शिरोही या शेळीच्या जात ही एक चांगली जात आहे.

ही शेळी दूध व मांस उत्पादनासाठी खूप चांगली जात आहे. या जातीच्या बोकडाची ईद साठी खूप मागणी असते या जातीची बोकड देखणी असतात मित्रांनो आपण शिरोही ह्या जातीच्या शेळी पालन यावर संपूर्ण माहिती पाहणार आहोत

शिरोही या जातीचे शेळीचे जातीचे शारीरिक वैशिष्ट्ये

1) मित्रांनो या जातीच्या बोकडाचे वजन जवळपास 60 ते 65 किलो पर्यंत असते व शेळीचे वजन 45 ते 50 किलो पर्यंत भरते.

2) या जातीच्या शेळीवर रंग तपकिरी व अंगावर विविध प्रकारचे रंगछटा दिसतात. ह्या शिरोही जातीच्या शेळीचे डोळे काळे आणि तपकिरी रंगाचे असतात.

शिरोही जातीच्या शेळीचे व्यवस्थापन

1) मित्रांनो या जातीच्या शेळीला दिवसातून पाच ते सहा किलो वैरण देणे आवश्यक आहे आणि यामध्ये तीस टक्के सुखाचारा आणि सत्तर टक्के हिरवा चारा द्यावा 

2) जे हिरवा चारा असतो त्यामध्ये शेळीला जास्त प्रोटीन असलेला चारा दिला तर तिची त्यापासून चांगली वाढ होते आणि आपल्याला उत्पन्नही चांगले मिळू शकते मित्रांनो त्यामध्ये आपण दशरथ घास हादगाव शेवरी मेथी घास तसेच हत्ती गवत इत्यादी पाला देऊ शकतो.

3)  मित्रांनो जर तुम्ही जर बंदिस्त पद्धतीने शेळीपालन करता तर प्रत्येक शेळीला दररोज 15 ते 20 ग्रॅम मिनरल मिक्स्चर द्यवे , कारण त्यातून शेळीत प्रजनन संबंधित काही दोष दिसून येणार नाही त्याच्यामुळे शेळीच्या आरोग्य चांगले राहील
आणखी मित्रांनो त्याचबरोबर लसीकरण सुद्धा (Shirohi Sheli Palan) वेळेवर करून घ्यावे व शेळ्यांचे डी वॉर्मिंग पदर 6 महिन्यातून एक वेळेस करावे.

4) या  सिरोही जातीच्या शेळ्यांला त्यांच्या वयोमानानुसार आणि त्यांची शारीरिक क्षमता पाहून शेडमध्ये वेगवेगळे ठिकाण बनवावेत. जे लहान पिल्ले असतात त्यासाठी वेगळा ठिकाण, तसेच नर शेळ्यांसाठी वेगळे ठिकाण अशा पद्धतीने वेगवेगळी ठिकाणे बनवावी.

शिरोही जात कशी आहे फायद्याची ?

मित्रानो ही शेळी दीड वर्षा मधून दोन वेळा (Shirohi Sheli Palan) विते आणि मित्रांनो या शेळीचे दूध देण्याची प्रमाण जर बघितलं तर त्याचे योग्य व्यवस्थापन जर असलं तर दिवसाला एक ते दोन लिटर दूध देते.

मित्रानो या शेळीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कोणत्याही प्रकारच्या वातावरणामध्ये चांगली राहते कारण ही शेळी वातावरणाशी जुळवून घेते. जर तापमान पाहिले गेलं तर चार ते पाच डिग्री पर्यंत थंडी सहन करते.40 पेक्षा जास्त उष्ण ता सुद्धा ही शेळी सहन करू शकते.

मित्रांनो आपण वरील लेखात पाहिलो (Shirohi Sheli Palan) आहोत शिरोही या जातीचे शेळीपालन आपण कसे करू शकता व त्यातून आपण चांगला नफा मिळऊ शकतात मित्रांनो ही माहिती आवडल्यास इतर पशुपालकांना नक्की पाठवा.

Leave a Comment