Shettale Yojana 2022 Maharashtra | शेततळे अनुदानात मोठी वाढ पहा ती किती

Shettale Yojana 2022 Maharashtra | शेततळे अनुदानात मोठी वाढ पहा ती किती

Shettale Yojana 2022 Maharashtra

Shettale Yojana 2022 Maharashtra : नमस्कार सर्व शेतकरी बांधव व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत आता मोठा बदल करण्यात आलेला आहे. आणि तो बदल म्हणजे आता शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्यात येणार आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

लवकरच या ठिकाणी शासन निर्णय सुद्धा येऊ शकतो. तर याच बरोबर अनुदान योजनेअंतर्गत आता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना यामधून शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे दिले जाणार आहे.

Shettale Yojana 2022 Maharashtra

तरीही कोणाला दिले जाणार आहेत किती अनुदान यादी केली आहेत 50% याठिकाणी अनुदानात वाढ करण्यात आली आहे. तर संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहुयात हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये वैयक्तिक शेततळ्याचा समावेश करण्याचा निर्णय आज झाला. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

शेततळे अनुदान योजना 2022

यापूर्वी “मागेल त्याला शेततळे” योजनेत शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या ५० हजार रुपयांच्या अनुदानात. ५० टक्के वाढ करून या योजनेत शेतकऱ्यांना विविध आकारमानाच्या वैयक्तिक शेततळ्यासाठी शासनाने निश्चित केलेला.खर्चाच्या मापदंडा एवढे किंवा ७५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

मागेल त्याला शेततळे योजना

शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, पिकांच्या शाश्वत उत्पादनाची व हमखास आर्थिक उत्पन्नाची खात्री मिळावी यादृष्टीने वित्तमंत्र्यांनी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली होती. त्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

 


📢 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळतंय अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!