Shet Piakache Sanrakshan | हे जुगाड पहा शेतात कोणतेही वन्य प्राणी येणारच नाही पहा लगेच

Shet Piakache Sanrakshan | हे जुगाड पहा शेतात कोणतेही वन्य प्राणी येणारच नाही पहा लगेच

Shet Piakache Sanrakshan

Shet Piakache Sanrakshan :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असा जुगाड. शेतकरी बांधवांनो आता शेतामध्ये रानडुक्कर हरिण, रानगाय, कोणतीही जनावर असतील, तर ते शेतात येणार नाही. यासाठी शेतकऱ्यांचे ही जुगाड आहे. शेतकऱ्यांनी काय तयार केलेल आहे. त्यापासून जनावरे कशी शेतात येणार नाही, याबाबत संपूर्ण अपडेट या लेखात दिलेल आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Shet Piakache Sanrakshan

जैविक कुंपणाचे उत्तर शोधले :- खापरवाडी बुद्रुक येथील जगन प्रल्हाद बागडे यांच्याकडे 20 एकर शेतजमीन आणि कसायला घेतलेली 50 एकर जमीन आहे. आई-वडील आणि मोठा भाऊ गोपाल असा परिवार आहे. भाऊ अकोटमध्ये चारचाकीचा गाडीचा व्यवसाय करतात. जगन शेतीचे व्यवस्थापन पाहतो. त्यांना वन्यप्राण्यांचाही खूप त्रास झाला. त्यासाठी तारेचे कुंपण घालण्यासाठी एकरी 40 हजारांहून अधिक खर्च येत होता. तसेच क्षेत्रफळ मोठे असल्याने तो लाखाच्या घरात जाणार होता. खूप विचार आणि अभ्यास केल्यावर कल्पना आली की निवडुंगाचे (cactus) कुंपण उपयोगी असू शकते असा विचार मनात आला. जंगलात वर्षानुवर्षे दिसणारे हे काटेरी झाड असून, कोणताही प्राणी ते खात नाही. तीक्ष्ण काट्यांमुळे वन्यजीव त्याच्या जवळ फिरकतही नाहीत.

निवडुंगाची जणू तटबंदी झाली

पहिल्या टप्प्यात जगन यांनी मजुरांच्या मदतीने छोट्या फांद्या लावल्या. कोणतेही व्यवस्थापन न करता झाडे मोठ्या प्रमाणात वाढली. शेता भोवती जणू तटबंदी तयार झाली. आज या निवडुंगाचे 50 एकराला कुंपण तयार झाले असून, झाडे 10 ते 12 फूट उंच वाढली आहेत. प्रत्येक दोन झाडांमधील अंतर एक फूट आहे. झाडांचा बुंधा मजबूत झाला असून कोणीही प्राणी शेतात घुसण्यास धजावत नाही. त्यामुळे पीक संरक्षणाचे काम बंद झाले आहे. सहा-सात वर्षांपूर्वी 30 एकरासाठी केवळ 15 हजारांचा खर्च झाला होता. दोडका, कारले, वाल आदी पिकांचीही कुंपणावर लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या परिसरात सेंद्रिय कुंपण करण्याचे हे एकमेव उदाहरण असावे.

शेतकऱ्यांनाही मिळाली प्रेरणा

जगनच्या प्रयोगातून प्रेरणा घेऊन 75 ते 80 शेतकऱ्यांनी तीन-चार वर्षांत कमी खर्चात निवडुंगाची लागवड करण्याचा विडा उचलला आहे. जगन यांनी स्वत: त्यांना मोफत फांद्या दिल्या आहेत आणि त्यांना मार्गदर्शनही केले आहेत.

कुंपणाचे काय झाले फायदे
  • वन्य प्राण्यांचा त्रास संपला
  • मोठ्या प्रमाणात मृदासंवर्धन झाले.
  • थंडीच्या लाटेत पिकांचे टळले
  • पिकावर होणारा कीटकांचा त्रास कमी झाला.
  • पूर्वी शेतकऱ्याने करवंदाचे कुंपण केले होते. मात्र ते लांब पसरत होते. त्या तुलनेत निवडुंग उभे वाढत असल्याने अधिक फायदेशीर ठरले.
  • या कुंपणावर वेलवर्गीय पीक घेऊन आर्थिक फायदाही होत आहे.
Shetila Kumpan Kase v konte karave

खापरवाडी बुद्रुक (जिल्हा अकोला) येथील जगन बागडे यांनी शेतांची सतत होणारी नासधूस आणि वन्य प्राण्यांमुळे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन कमी खर्चात सेंद्रिय कुंपणाचा पर्याय दिला. सुमारे 50 एकरात 10 ते 12 फूट उंच निवडुंग कुंपण लावून विविध पिकांचे कायमस्वरूपी संरक्षण करण्यात त्यांना यश आले आहे. (source:-Marathi Batmya)


📢 पीएम किसान मानधन योजना अतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रु येथे पहा माहिती  :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!