Sheli Palan Karj Yojana | शेळीपालनासाठी या बॅंक देतात 50 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Sheli Palan Karj Yojana | शेळीपालनासाठी या बॅंक देतात 50 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Sheli Palan Karj Yojana

Sheli Palan Karj Yojana: शेतीला जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय आहेत. त्यातीलच एक व्यवसाय अनेक शेतकरी करतात. शेळी पालन हा व्यवसाय अनेक शेतकरी करत आहेत. शेळी पालन व्यवसाय अगदी कमी जागेत व कमी खर्चात केला जातो.

ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनाकडे दोन ते तीन शेळ्या आहेत. परंतु दोन ते तीन शेळ्यांत व्यवसायाला आर्थिकदृष्ट्या चालना मिळत नाही. तर यासाठी अनेक शेळ्यांची गरज असते‌. (Sheli Palan Sathi Karj)

हेही वाचा :- नवीन विहीर साठी मिळणार 3 लाख रु अनुदान आजच घ्या लाभ

Sheli Palan Karj Yojan

शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करायचा असेल, तर तुम्हाला आर्थिक मदत हवी असते. शेळीपालनसाठी बॅंक तुम्हाला कर्ज देत असते. शेळीपालन व्यवसायासाठी कोणत्या बॅंक कर्ज देतात, कागदपत्रे कोणती लागतात आणि अर्जाची प्रक्रिया जाणून घेऊया.

शेळीपालनासाठी या बॅंक देतात कर्ज

 • आयडीबीआय बॅंक
 • स्टेट बँक ऑफ इंडिया
 • कॅनरा बँक
 • प्रादेशिक ग्रामीण बॅंक
 • राज्य सहकारी कृषी आणि विकास बॅंक
 • स्टेट बँक सहकारी आणि नागरी बँक

शेळीपालनच्या या गोष्टींसाठी मिळते कर्ज

शेळीपालनासाठी शेळी खरेदी करण्यासाठी, शेळ्यांसाठी चारा खरेदी करण्यासाठी, शेळीसाठी शेड बांधण्यासाठी कर्ज मिळते. यामध्ये सरकारी आणि व्यावसायिक कर्जाचा समावेश होतो.

शेळीपालनासाठी बॅंक दोन प्रकारे कर्ज देते‌. पहिला प्रकार असा आहे की तुम्हाला शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यावेळी बॅंक व्यावसायिक कर्ज देते. दुसरा प्रकार असा आहे की तुमचा शेळीपालन व्यवसाय आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळणार 50% अनुदान आजच करा अर्ज 

या व्यवसायासाठी लागणारे खेळते भांडवल जर हवे असेल तर यासाठी तुम्हाला खेळते भांडवल म्हणून कर्ज दिले जाते. शेळीपालनासाठी कर्ज महिन्याची मर्यादा त्या बॅंकेच्या त्या विहीत नियमांच्या आधारे ठरवले जाते.

यामध्ये आयडीबीआय ही बॅंक 50 हजार ते 50 लाखांपर्यंत कर्ज देते. इतर बॅंक त्यांच्या ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत कर्ज देतात.

आवश्यक कागदपत्रे
 1. सहा महिन्यांचे बॅंक स्टेटमेंट
 2. पत्त्याचा पुरावा
 3. उत्पन्नाचा दाखला
 4. आधार कार्ड
 5. बीपीएल कार्ड (असल्यास)
 6. जात प्रमाणपत्र (SC / ST / OBC असल्यास)
 7. वय अधिवास प्रमाणपत्र
 8. शेळीपालन व्यवसायचा प्रोजेक्ट रिपोर्ट
 9. जमीन नोंदणी दस्तऐवज
 10. चार पासपोर्ट साइज फोटो
अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

शेळीपालनासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्या ग्रामपंचायत किंवा ब्लॉक ऑफिसला भेट द्यावी. या ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळून जाईल. मिळालेला अर्ज व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स अर्जासोबत जोडावे.

हेही वाचा :- कुकुट पालन साठी मिळणार 75% अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज 

ब्लॉक आहे किंवा ग्रामपंचायतीला सादर केल्या जाऊ शकतात. जर तुम्ही शेळीपालन योजनेतंर्गत कर्ज घेण्यासाठी पात्र असाल तर खर्च आणि अनुदानाचा लाभ तुम्हाला दिला जातो.


📢 शेतजमीन खरेदी साठी शासन देते अनुदान आजच घ्या लाभ :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी मिळणार 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!