Sheli Mendhi Palan Yojana | शेळी पालन अनुदान योजना आजचा घ्या लाभ

Sheli Mendhi Palan Yojana | शेळी पालन अनुदान योजना आजचा घ्या लाभ

Sheli Mendhi Palan Yojana

Sheli Mendhi Palan Yojana :- गटवाटप , शेळी गट वाटप ,गाई म्हशी , कुक्कुट पक्षी अनुदान योजना २०२१ उस्मानाबाद जिल्ह्याचे अर्ज सुरु
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना सन 2011-12 पासून कार्यरत असून या दोन्ही योजनांतर्गत लाभधारकांना लाभ देताना, शेळ्या तसेच बोकड – नर मेंढा यांची संदर्भाधिन शासन निर्णयांमध्ये विहित केलेली किंमत आधारभूत मानून त्यानुसार लाभ देण्यात येत आहेत.

परंतु, शेळ्या तसेच बोकड – नर  यांच्या किंमतीत वेळोवेळी वाढ होत असल्याने, शासन निर्णयात विहित दराने शेळ्या- तसेच बोकड उपलब्ध करुन देण्यास अडचणी येत असून, त्याबाबत लाभधारक तसेच लोकप्रतिनिधींकडून उक्त योजनांतर्गत दर सुधारित करण्याची वारांवार मागणी करण्यात येत आहे.

 Sheli Mendhi Palan Yojana

त्या अनुषंगाने राज्यस्तरीय योजना व जिल्हास्तरीय योजनेमध्ये एकरुपता आणण्याच्या दृष्ट्टीने संधर्भाधीन दिनांक 02.07.2011 व दिनांक 16.09.2011 या शासन निर्णयाद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांमधील शेळी/मेंढी वाडा, खाद्याची व पाण्याची भाांडी व आरोग्य सुविधा आणि औषधउपचार या उपघटकाांना वगळून शेळ्या / मेंढ्याचे सध्याचे बाजारमूल्य विचारात घेऊन, उक्त किमतीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने दिनांक 12.5.2021 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शेळीपालन अनुदान 2021 योजनेचे स्वरूप :

 • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी/संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा पप्रजातींच्या पैदासक्षम 10 शेळ्या व 1 बोकड
 • योजनेंतर्गत देय अनुदान निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थी वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एकूण खर्च (शेळी गट
  व शेळ्यांसाठीचा वाडा) रू. २,३१,४००/- इतका आहे.
 • गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यास १०० टक्के निधी स्वहिस्सा / वित्तीय संस्थांचे कर्ज याद्वारे उभा करावयाचा आहे.
 • सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के तथापि, प्रति गट कमाल मर्यादा रू. १,१५,७००/- या प्रमाणे अनुदान  देय राहील. २० शेळ्या +२ बोकड अशा शेळी गट योजनेचा तपशील राहील .

शेळी मेंढी पालन योजनेच्या अति व शर्ती 

 • लाभार्थ्यांना उस्मानाबादी/संगमनेरी अथवा  माडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खनी व अन्य स्थानिक प्रजातींच्या  शेळी मेंढ्याच्या प्रजातीची निवड करण्याचे स्वातंत्र्य लाभार्थ्यांना राहील.
 • सदर योजनेमध्ये खुल्या व इमाव प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ५० टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहील.
 • व ५० टक्के हिश्श्याची रक्कम लाभार्थ्याने स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेऊन (किमान ५ टक्के स्वहिस्सा व उर्वरित ४५ टक्के बँकेचे कर्ज ) उभारणे आवश्यक आहे.
 • सदर योजनेमध्ये अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहील.
 • व २५ टक्के हिश्श्याची रक्कम लाभार्थ्याने स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेऊन (किमान ५ टक्के स्वहिस्सा व उर्वरित २० टक्के बँकेचे कर्ज ) उभारणे गरजेचे आहे .
 • शेळी मेंढी गटाच्या खरेदीनंतर वाहतुकीचा सर्व खर्च लाभार्थ्याने करणे आवश्यक राहील .
शेळी पालन योजनेची लाभार्थी पात्रता 
 1. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
 2. अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंतचे जमीन मालक )
 3. अल्प भूधारक (१ ते २ १ हेक्टरपर्यंतचे जमीन मालक)
 4. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले )
 5. महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते ड मधील )
शेळी पालन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
 • लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी कोअर बँकिंग सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचे खाते उघडणे गरजेचे आहे , जर अगोदरच बँक खाते असेल तर ते खाते या योजनेशी जोडणे आवश्यक आहे .
 • लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक व पॅन क्रमांक या बचत खात्याशी जोडणे बंधनकारक राहील.
 • अशा प्रकारे उघडण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये लाभार्थ्याने स्वहिश्याची रक्कम जमा केल्याची खात्री केल्यानंतर,शासकीय अनुदानाची रक्कम डीबीटी द्वारे खात्यामध्ये जमा होईल.

 

जिल्हा परिषदेअंतर्गत विशेष घटक योजनेतून ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे व शेळ्यांचे गट वाटप होईल. या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. तरी जेव्हा तुमच्या जिल्ह्यासाठी ही योजना सुरु होईल तेव्हा खाली दिलेले अर्ज डाउनलोड करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता . 

अप्लिकेशन फॉर्म  येथे डाउनलोड करा 


📢 200 गाई पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना  2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!