Rashi Bhavishya In Today | पहा काय आहे आपले 5 ते ११ पर्यंतचे राशी भविष्य

Rashi Bhavishya In Today | पहा काय आहे आपले 5 ते ११ पर्यंतचे राशी भविष्य

Rashi Bhavishya In Today

Rashi Bhavishya In Today : नमस्कार. आपण आज आपल्या राशी भविष्य विषयी जाणून घेणार आहोत. कोणत्या राशी मध्ये काय होणार विशेष तर कोणत्या राशीच्या नागरिकांना कोणती घ्यावी लागेल.

काळजी हे राशी भविष्य 5 ते 11 तारखेचे आहे चला तर पाहूया काय आहे. आजचे राशी भविष्य.

Rashi Bhavishya In Today

मेष : सप्ताहात राशीतील शुक्र-हर्षलच्या सहयोगात तरुणांच्या कलात्मक अभिव्यक्तींना उजाळा मिळेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती विजयी चौकार-षटकार मारतील. ता. ७ ते ९ हे दिवस सुवार्तांतून जल्लोषाचे.

मात्र, सप्ताहात सुरुवातीस कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात जपावं अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत भाग्योदय.

आदर-सत्कार होईल

वृषभ : सप्ताहात वक्री शनीची पार्श्‍वभूमी कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना प्रारंभी नोकरीत कष्टप्रद.नोकरीतील नव्या जडणघडणीतून अस्वस्थता बाकी रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ आणि ८ हे दिवस वैयक्तिक आदर-सत्काराचे.

पती वा पत्नीचा भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ चा गुरुवार गुरुप्रचितीचा.

व्यावसायिक उपक्रम यशस्वी होतील

मिथुन : सप्ताहातील मोठी लाभसंपन्न रास राहील आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ ग्रहांचं उत्तम पॅकेज राहील. व्यावसायिक नवे उपक्रम यशस्वी होतील. कलाकारांचं नैराश्‍य जाईल.

पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक मंदीतून पूर्ण बाहेर काढणारा. तरुणांना उत्तम नोकरी.

मोठ्या यशातून चर्चेत याल

कर्क : सप्ताह शुभ ग्रहांच्या अखत्यारीतूनच फळं देणारा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ ते ११ हे दिवस मोठ्या यशातून फ्लॅश न्यूजमध्ये आणतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी वक्री शनीच्या पार्श्‍वभूमीवर जुनाट व्याधींचा उद्‌भव सांभाळावा.

आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ स्त्रीचिंतेचा. सप्ताहाचा शेवट घरात तरुणांच्या सुवार्तेचा.

कायदेशीर बाबी सांभाळाव्यात

सिंह : शुक्र-हर्षल सहयोगाचा पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती पूर्ण लाभ उठवतील.

तरुणांनो अवश्‍य लाभ घ्या. शिक्षण, विवाह वा नोकरी या घटकांतून उत्तम क्‍लिक होणारा सप्ताह. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहारंभी कायदेशीर बाबी सांभाळाव्यात. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट परदेशी संधींचा.

परिस्थितीची उत्तम साथ मिळेल

कन्या : सप्ताहात कोणताही शॉर्टकट महागात पडेल. बाकी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरी-व्यवसायात परिस्थितीची उत्तम साथ मिळेल. ता. ९ व १० हे दिवस मोठे भाग्याचे. विवाहयोग.

उत्तरा नक्षत्रास मान-सन्मान थक्क करतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी दुष्टोत्तरं टाळावीत.

विदेश व्यापारातून लाभ

तूळ : ग्रहांचं फिल्ड शुक्र-हर्षल सहयोगातून संवेदनशील ता. ७ ते ९ हे दिवस उद्योजकांना मोठे साथ देतील. विदेश व्यापारातून लाभ. प्रेमिकांना साद घालणारं ग्रहमान. मात्र, संयम पाळा.

सप्ताहाचा शेवट विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मॅन ऑफ दि मॅच करणारा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ७ व ८ जून हे दिवस सुवार्तांचे.

नोकरीतील स्थान बळकट

वृश्‍चिक : ग्रहांचं फिल्ड मंगळ-गुरू ग्रहांच्याच ताब्यात राहील. ता. ७ ते ९ हे दिवस बुद्धिजीवींना मोठे फलदायी होतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींचं नोकरीतील आसन बळकट होईल. ज्येष्ठा नक्षत्रास शुक्रवार छान गाठीभेटींचा. मतलब साध्य होतील.

सरकारी कामं पार पडतील

धनू : सप्ताह आपल्या राशीस अतिशय भन्नाट फळं देईल. शुक्र-हर्षल योगातून आपला मोठा प्रभाव पाडणारा सप्ताह. ता. ६ ते ८ या दिवसांत गाठीभेटी, मुलाखती वा महत्त्वाची सरकारी कामं उत्तम पार पडतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना रेकॉर्डब्रेक फळं मिळतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात फसवणूक टाळावी.

कामं होतील, सुवार्ता समजतील

मकर : सप्ताहातील ग्रहमान मोठं मजेदार राहील. स्वतंत्र व्यावसायिकांना लाभसंपन्न करणारा सप्ताह. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र-हर्षल सहयोग मोठे परिस्थितिजन्य लाभ देईल. सहजगत्या गाठीभेटी किंवा कामं होतील. ता. ९ व १० हे दिवस एकूणच उत्तम प्रतिसाद देणारे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना (Rashi Bhavishya In Today) नोकरीत सुवार्ता.

कटकटी संपतील, वास्तुयोगही…

कुंभ : शुभ ग्रहांचा मोठा आवाका राहील. अर्थातच वक्री शनीची पार्श्‍वभूमी निभावून नेणार आहात! शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र-हर्षल सहयोगाची पार्श्‍वभूमी ऑनलाइन क्‍लिक होणारी. नोकरीच्या संधी. प्रेमिकांना प्रतिसाद. ता. ७ व ८ हे दिवस चमत्कारांचे. पूर्वाभाद्रपदा व्यक्तींना वास्तुयोग. कायदेशीर कटकटी संपतील.

नोकरीत अनुकूल वातावरण

मीन : सप्ताह निश्‍चितच ऊर्जा देणारा. ता. ९ ते ११ हे दिवस तरुणांना छानच. महत्त्वाच्या कार्याचं नियोजन कराच. नोकरीत अनुकूल वातावरण राहील, लाभ घ्याच. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र-हर्षल सहयोगातून उत्तम ग्लॅमर मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी राजकारण टाळावं. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी संशयास्पद वागू नये.

 

📢 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळणार 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!