Punjab Dakh Havaman Andaj Best | महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंताजनक ! यंदा मान्सून काळात शेतकऱ्यांच 1 मोठं नुकसान होईल; पंजाबराव डख यांचा नवीन मान्सून अंदाज

Punjab Dakh Havaman Andaj: पंजाबराव डख यांनी नुकतीच मानसून 2023 बाबत मोठी माहिती दिली आहे. या मान्सून अंदाजामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. वास्तविक डखं यांनी वर्तवलेला हवामान अंदाज हा तंतोतंत खरा ठरत असल्याचे शेतकरी व्यक्त करत आहे. अशातच त्यांनी यावर्षी महाराष्ट्रातील काही भागात महापुराची शक्यता वर्तवली आहे. 

Punjab Dakh Havaman Andaj

महापुरामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून नुकसान होत आहे. मान्सून काळात अतिवृष्टीमुळे, अधिकच्या पावसामुळे महापूर येत आहे. यंदा देखील तशीच परिस्थिती तयार होणार असल्याचे मत पंजाब रावांनी व्यक्त केले आहे.

अशा परिस्थितीत आज आपण डख यांनी नेमक्या कोणत्या भागात महापूराची शक्यता वर्तवली आहे याबाबत जाणून घेणार आहोत तसेच मान्सून बाबत डक यांनी वर्तवलेला सविस्तर हवामान अंदाज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असेल मान्सून 2023?

यंदाच्या मान्सून बाबत वेगवेगळ्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्कायमेट या खाजगी हवामान (Punjab Dakh Havaman Andaj) अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यंदा पर्जन्यमान कमी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. 

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

याशिवाय डखं यांनी देखील यावर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊसमान राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. डक यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनच आगमन 8 जून 2023 ला होणार आहे. मान्सूनचे आगमन जरी आठ जूनला होणार असले तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून हा 22 जून पर्यंत पोहचेल.

कुठं येणार महापूर?

22 जून पर्यंत राज्यात जवळपास सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. यानंतर 27 जून ते 30 जून या कालावधीमध्ये राज्यात खरीप हंगामातील पेरण्या होतील असे देखील मत त्यांनी व्यक्त केल आहे.

याशिवाय यंदा 2022 प्रमाणे चांगला पाऊस राहणार असल्याचे त्यांनी (Punjab Dakh Havaman Andaj) सांगितले असून जूनच्या तुलनेत जुलैमध्ये आणि जुलैच्या तुलनेत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात अधिक पाऊस राहणार आहे.

यंदा 2022 प्रमाणे मान्सून काळात चांगला पाऊस होणार आहे. यामुळे याही वर्षी कृष्णा नदी काठावर महापूर येणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे कृष्णा नदीकाठी वसलेल्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. 


📢 पशुशेड अनुदान योजना अतर्गत मिळणार 1.60 लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment