Prasuti Yojana Maharashtra | प्रसुती योजना 15 ते 20 हजार रुपये अनुदान मिळवा, असा करा अर्ज

Prasuti Yojana Maharashtra | प्रसुती योजना 15 ते 20 हजार रुपये अनुदान मिळवा, असा करा अर्ज

Prasuti Yojana Maharashtra

Prasuti Yojana Maharashtra: प्रसुती योजनेचा लाभ घेऊन पत्नीला नैसर्गिक प्रसुतीसाठी 15 हजार रुपये तर सिझेरीनसाठी 20 हजार रुपये अनुदान मिळते. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. हे अनुदान कशाप्रकारे तुम्हाला मिळेल, कागदपत्रे कोणती लागतात व ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवर करायचा अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Prasuti Yojana Maharashtra

तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रसुती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे देखील जाणून घेणार आहोत. ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे माहित करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे लागतात जाणून घेऊया. कारण तुम्हाला यामधील कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतील.

आवश्यक कागदपत्रे

 1. सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
 2. प्रसुती घरी झाल्यास ग्रामसेवक, ग्रामपंचायत, नगरपालिका, महा नगर पालिका, जन्म नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
 3. रेशन कार्ड
 4. स्वंयघोषणापत्र
 5. डिस्चार्ज कार्ड

महत्वपूर्ण सूचना – दिलेली कागदपत्रे तुम्ही मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये स्कॅन करून ठेवा. 2 एमबी साइजच्या आत स्कॅन करून ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी हे काम करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करा.

असा करा ऑनलाईन अर्ज

 • सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राऊझर मध्ये bandhkam kamgar असं सर्च करा.
 • बांधकाम कामगार वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा.
 • यानंतर construction worker apply online for claim या ऑप्शनवर क्लिक करा.
 • Select सेक्शनवर क्लिक करून New Claim या ऑप्शनवर क्लिक करा.
 • यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका.
 • रजिस्ट्रेशन क्रमांक टाकल्यानंतर, proceed to form या बटणावर क्लिक करा.
 • तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून Validate OTP या ऑप्शनवर क्लिक करा.
 • योजना निवडून संपूर्ण माहिती योग्य भरा.
 • आता तुम्हाला तुमचा संपूर्ण अर्ज दिसेल. पेजच्या थोडं खाली येऊन योजना श्रेणीवर क्लिक करून योजना निवडा.
 • योजना मध्ये आरोग्य कल्याण योजना निवडा.
 • यानंतर Select Scheme म्हणजेच योजनेच्या रकान्यात Financial Assistance of RS 15000 for Natural Delivery and RS 20000 for Delivery by Caesarean हा पर्याय निवडा.
 • अर्जदाराचे मुलाचे नाव निवडा.
 • मुलाचे नाव निवडल्यानंतर आधार क्रमांक, जन्मतारीख व इतर माहिती ऑटोमॅटिक येईल.
 • प्रसुतीचे ठिकाण निवडा. प्रसुती रुग्णालयात झाली असेल तर रुग्णालय हे ऑप्शन निवडा जर घरी झाली असेल तर घर हे ऑप्शन निवडा.
 • यानंतर रुग्णालयाचे नाव टाका.
 • प्रसुती योजनांबाबत दिलेल्या ऑप्शन मधून योग्य ती माहिती सिलेक्ट करा.
 • ज्या ठिकाणी प्रसुती झाली असेल, त्या ठिकाणचा पत्ता टाका.
 • प्रसुतीचा प्रकार दिलेल्या ऑप्शन निवडा जसे की नैसर्गिक प्रसुती Natural Delivery व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती Caesarean Delivery हे ऑप्शन निवडा.
 • यानंतर जन्म प्रमाणपत्र नोंदणी क्रमांक टाका.
 • जन्म प्रमाणपत्र जारी करणाऱ्याचा प्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा जसे की महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत यापैकी एक ऑप्शन निवडा.
 • प्रमाणपत्र जारी करणाऱ्याचे नाव टाका.
 • योजनेसाठी जी कागदपत्रे लागत असतील ती कागदपत्रे अपलोड करा.
 • सर्वात शेवटी Submit ऑप्शनवर क्लिक करा.

अशाप्रकारे प्रसुती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. या योजनेतंर्गत तुम्हाला 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते.


📢 नवीन व्विहीर अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड पालन अनुदान योजना :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!