Poultry Farm Loan | कुक्कुटपालन व्यवसायसाठी ‘या’ बॅंक देतात कर्ज, असे घ्या कर्ज

Poultry Farm Loan :- पोल्ट्री फॉर्म म्हणजेच मराठी मध्ये कुक्कुटपालन व्यवसाय होय‌. कुक्कुटपालन पालन व्यवसाय देशात झपाट्याने वाढत आहे, हा व्यवसाय फायदेशीर देखील ठरला आहे. परंतु, या व्यवसायासाठी सुरूवातीला गुंतवणूक करावी लागते.

Poultry Farm Loan

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे जर पैसे नसतील, तर यासाठी एकच पर्याय तो म्हणजे लोन घेणे. तुमच्या मनात प्रश्न आला असेल, की कुक्कुटपालन व्यवसायसाठी बॅंक कर्ज देते का, जर देतात, तर कर्ज कोणत्या बॅंक देतात आणि किती काळ कर्ज देतात जाणून घेऊया. तुम्हाला कुक्कुटपालन पालन व्यवसाय करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील, तर काळजी करण्याची गरज नाही. हा व्यवसाय करण्यासाठी सरकारी बॅंकासह खाजगी बँक देखील लोन देणार आहेत.

 
सरकारी योजना ग्रुप Join करा

poultry farm loan subsidy

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र (Nabard Scheme) : सरकार नाबार्ड (National Bank for Agriculture & Development) मार्फत कुक्कुटपालन पालन व्यवसायासाठी कर्ज आणि अनुदान दिले जाते.

 • पोल्ट्री फार्म कर्जावर सरकार 25 टक्के सबसिडी देते.
 • ही 25 टक्के सबसिडी सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी आहे.
 • सरकार SC/ST वर्गासाठी 35 टक्के सबसिडी देते.

हेही वाचा; 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान NLM योजन येथे पहा जीआर 

या बॅंकाकडून पोल्ट्री फार्मसाठी लोन

 • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेतंर्गत SBI बॅंक लोन देते. 
 • व्याज दर – 10.75 टक्के
 • कर्जाचे स्वरूप – कृषी मुदत कर्ज
 • कर्जाची कमाल रक्कम – 10 लाखांपर्यंत
 • परतफेड कालावधी – 3 ते 5 वर्षे
 • जमानत – आवश्यक नाही
 • प्रक्रिया फी – निशुल्क 50,000 रुपयांपर्यंत आणि 0.50% फी 50,000 ते 5 लाखांच्या वर
bank of indian kukut palan loan
 • व्याज दर – अर्जदाराच्या प्रोफाइल आणि व्यवसायाच्या आवश्यकतावर अवलंबून असते
 • कर्जाची रक्कम – पोल्ट्री युनिटचा प्रकार आणि आकार यावर कर्जाची रक्कम अवलंबून असेल
 • प्रक्रिया फी – शून्य रुपये
 • जमानत – 1 लाखांपेक्षा कमी आणि त्याहून अधिक कर्जासाठी
 • युनिट पात्रता – प्रति बॅच 200 ते 500 पक्षी आवश्यक आहे

हेही वाचा; 100% अनुदानावर शेळी शेड,गाय/म्हैस गोठा अनुदान योजना सुरु पहा जीआर 

कॅनरा बॅंक पोल्ट्री फार्म लोन
 • व्याज दर – अर्जदाराच्या प्रोफाइल आणि व्यवसायाच्या आवश्यकतावर अवलंबून असते
 • परतफेड कालावधी – 9 वर्षांपर्यंत
 • मार्जिन – 1 लाखापर्यंत कर्ज – शून्य 1 लाखाच्या वर कर्ज – 15 ते 25 टक्के
 • जमानत – 1 लाख रुपयांपेक्षा कमी आणि त्याहून अधिक कर्जासाठी
फेडरल बँक पोल्ट्री फार्म लोन
 • व्याज दर – अर्जदाराच्या प्रोफाइल आणि व्यवसायाच्या आवश्यकतावर अवलंबून असते
 • कर्जाचे स्वरूप – कृषी मध्यम मुदत कर्ज
 • कर्जाची रक्कम – किमान 1,50,000 रुपये ज्यामध्ये प्रति बॅच 500 पक्षी असावे
 • परतफेड कालावधी – 7 वर्षांपर्यंत
 • जमानत – 10 ते 20 टक्के मार्जिनसह जमीन गहाण

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर करीता 3 लाख रु. अनुदान करा ऑनलाईन अर्ज व पहा जीआर 

बॅंक ऑफ बडोदा पोल्ट्री फार्म लोन
 • व्याज दर – अर्जदाराच्या प्रोफाइल आणि व्यवसायाच्या आवश्यकतावर अवलंबून असते
 • कर्जाचे स्वरूप – मुदत कर्ज व रोख क्रेडिट
 • परतफेड कालावधी – मुदतीसाठी, कर्ज 3 वर्ष ते 7 वर्षांपर्यंत आहे आणि कॅश क्रेडिटसाठी वार्षिक पुनरावलोकनासह 12 महिने आहे
पोल्ट्री फार्म लोन हे व्यक्ती घेऊ शकतात
 • व्यक्ती
 • एकमेव मालकी
 • भागीदारी संस्था
 • कंपन्या
 • सहकारी
 • अल्परोजगार असलेले व्यक्ती
 • भूमिहीन शेतमजूर
 • छोटे शेतकरी
कुकुट पालन लोन योजना कागदपत्रे
 • पोल्ट्री फार्म अर्ज
 • पासपोर्ट साइज फोटो
 • निगमन प्रमाणपत्र
 • व्यवसाय पॅन कार्ड
 • ॲनिमल केअर मानकांकडून परवाना
 • पोल्ट्री फार्म लायसन्स
 • मालकीच्या/भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनीसंबंधीच्या जमिनीच्या नोंदीच्या प्रती,
 • संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या असाव्यात
 • इमारती बांधकामांचा आराखडा आणि अंदाज
 • उपकरणे, पिंजरे, पक्षी खरेदी चलन
 • विमा पॉलिसी
पोल्ट्री फार्मसाठी एवढा खर्च लागतो

1000 ते 5000 चौरस फूट पोल्ट्री फार्म शेड तयार करण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यासाठी तुम्ही सरकारी व खासगी बॅंकाकडुन लोन घेऊ शकता.

Poultry Farm Loan

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 100% अनुदानावर सोलर पंप ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाई फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!