Post Office New Scheme | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, फक्त 299 रुपयांत 10 लाखांचा विमा

Post Office New Scheme | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, फक्त 299 रुपयांत 10 लाखांचा विमा

Post Office New Scheme

Post Office New Scheme : कोरोना काळात रुग्णांची एवढी बिल झाली होती की, बिल भरणं देखील मुश्किल झाले होते. परंतु जीव महत्वाचा असतो यासाठी कोरोना काळात घर गहाण ठेवून औषध-उपचार केले.. या कारणांमुळे त्यानंतर अनेकांनी आरोग्य विमा काढायला सुरुवात केली. तरीही सर्वसामान्य नागरिक अजूनही आरोग्य विमा योजनेपासून वंचित असल्याचे दिसून येते.

Post Office New Scheme

आरोग विमा सेवा देणाऱ्या बाजारात अनेक कंपन्या उपलब्ध असल्या, तरी त्यांच्या पॉलिसी सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडत नाहीत. ही सामान्य नागरिकांची महत्वाची बाब लक्षात घेऊन अगदी स्वस्त आरोग्य विमा पॉलिसी योजना पोस्टाने आणल्या आहेत. यासाठी पोस्ट विभागाने ‘टाटा एआयजी विमा कंपनी’सोबत (Tata AIG Vima Scheme) एक करार केलेला आहे.

फक्त 299 व 399 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात तब्बल 10 लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. वर्षभरात विमाधारकाला या योजनेचे विमा संरक्षण मिळेल. ही पोस्ट विभागाची योजना 18 ते 65 वयोगटातील नागरिकांसाठी आहे. सर्व टपाल कार्यालयात अंतर्गत अटी शर्तींसह ही योजना राबविली जात आहे.

हेही वाचा : 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा अर्ज 

योजनेची वैशिष्ट्ये

  • पोस्ट विभागाच्या या योजनेत अवघ्या 299 किंवा 399 रुपयांच्या हप्त्यामध्ये एका वर्षासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळणार आहे.
  • विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास 10 लाखांपर्यंत संरक्षण दिले जाईल.
  • विमाधारकाला रुग्णालयात दाखल केल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च, तसेच घरी उपचार घेतल्यास 30 हजार रुपयांपर्यंतचा दावा करता येईल.
  • रुग्णालयाच्या खर्चासाठी 10 दिवसांसाठी रोज 1 हजार रुपये मिळतील.
  • कुटुंबाच्या वाहतूकीसाठी 25 हजार रुपयांपर्यंत खर्च देखील मिळणार आहे.

योजनेचा कालावधी

पोस्ट खात्याच्या या योजनेचा कालावधी एक वर्षाचा आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी जवळच्या कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट आरोग्य विमा योजनेचे नूतनीकरण करता येते‌. (Post Office Scheme)

Post Office New Scheme

हेही वाचा :- शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी साठी शासन देते आहे 100% अनुदान येथे करा अर्ज 

आरोग्य विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक खातं चालू असणं गरजेचं आहे. जर तुमचं खातं नसेल, तर नवं खातं उघडून या योजनेचा लाभ घेता येईल. (Post Office Scheme 399)

 

299 व 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये फरक

पोस्ट विभागाच्या 399 रुपयांच्या विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंत मदत मिळते.‌ तसेच 10 दिवस रोज 1 हजार रुपये, 25 हजार रुपये. वाहतूक खर्च व मृत्यूनंतर 5 हजार रुपये अंत्यसंस्कारासाठी खर्च मिळतो. परंतु, 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये हे सर्व खर्च मिळणार नाहीत.


📢 नवीन घरकुल योजना अतर्गत मिळणार 1.20 लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!