Police Bharti 2022 Maharashtra | राज्यात 7 हजार जागांसाठी होणार पोलिस भरती; भरतीची तारीख जाहीर

Police Bharti 2022 Maharashtra | राज्यात 7 हजार जागांसाठी होणार पोलिस भरती; भरतीची तारीख जाहीर

Police Bharti 2022 Maharashtra

Police Bharti 2022 Maharashtra : राज्यातील तरुणांनासाठी मोठी व आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच पोलिस भरती होणार आहे.गृहविभातर्फे 7 हजार जागांसाठी पोलिस भरती होणार आहे. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनासाठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे.

Police Bharti 2022 Maharashtra

पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना या भरतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. भरतीची तारीख काय? भरतीचे स्वरूप कसे असणार? याविषयीची माहिती जाणून घेऊया. पोलिस भरतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली.

पोलिस भरती महाराष्ट्र 2022

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तब्बल 50000 पोलिसांची पदे रिक्त आहेत. यामधील साडे पाच हजार मुलांची भरती होत आलेली आहे.

आता सात हजार जागांसाठी पोलिस भरती केल्या जाणार आहे. ही पोलिस भरती प्रक्रिया 15 जूनच्या तारखेपासून सुरू केली जाणार आहे. सात हजार पोलिस भरती नंतर अजून मोठी पोलिस भरती केल्या जाणार आहे.

मंत्रिमंडळासमोर आणखी 15 हजार पोलिसांच्या जागा भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. असे दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली. 

पोलिस भरती महाराष्ट्र 2022

पोलिस भरतीची भरपूर दिवसांपासून घोषणा होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पोलिस भरतीसाठी मैदानावर सराव सुरू केला होता. गेल्या दोन वर्षांपासून पोलिस भरती झालेली नाही. राज्यात लाखो तरुण पोलिस भरतीची तयारी करत आहेत.

अनेक दिवसांपासून तरुण मंडळी पोलिस भरतीची वाट पाहत होते. अखेर महाआघाडी सरकारने पोलिस भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोठी पोलिस भरती करण्यासाठी मंत्रिमंडळ नक्कीच परवानगी देईल. 

राज्यात पोलिसांच्या अनेक जागा रिक्त आहेत. यामुळे पोलिसांवर खूप ताण येत आहे. तो ताण कमी करण्यासाठी ही भरती करण्याची गरज आहे. असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Police Bharti Maharashtra 2022

या बातमीमुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असेल. 7 हजार जागांसाठी पोलिस भरतीची प्रक्रिया ‌झाल्यानंतर, पुन्हा 15 हजार जागांसाठी मोठी पोलिस भरती प्रक्रिया राबवणार आहे.

राज्यात 15 जून पासून पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. आता 7 हजार जागांसाठी पोलिस भरती होणार आहे. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनासाठी ही माहिती महत्वाची आहे. आपण थोडंसं सहकार्य करून, ही माहिती अवश्य पुढे तुमच्या मित्रांना नक्की पाठवा.


📢 कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!