Pm Ujjwala Yojana 2023: केंद्रातील मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ करण्याबरोबर सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना खुशखबरही दिली आहे.
देशात करोडो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर केली आहे. अशा प्रकारे या योजनेच्या कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे.
Pm Ujjwala Yojana 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाची मुदत.
आणखी एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. देशातील 9.60 कोटी लाभार्थ्यांना आता आणखी एक वर्षासाठी प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. तसेच लाभार्थी अनुदानावर 12 सिलिंडर घेऊ शकतात.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
एका वर्षात १२ सिलिंडर
याबाबत माहिती देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, “२०२२ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात १२ सिलिंडर आणि एका सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी (अनुदान) देण्याचा निर्णय घेण्यात आला.
असून आंतरराष्ट्रीय किमतीत कोणताही मोठा बदल नसल्यामुळे (Pm Ujjwala Yojana 2023 ) ही सबसिडी आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. अशा स्थितीत या उपक्रमाचा लाभ ९.६ कोटी कुटुंबांना आणखी एका वर्षासाठी घेता येईल. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे.
📢 पशुपालन साठी मिळणार शासनाकडून 90% अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाल साठी नवीन अर्ज सुरु :- येथे पहा