Pik Vima Yojana 2022 | खरीप व रबी हंगाम 2022-23 साठी पिक विमा जाहीर शासन निर्णय आला

Pik Vima Yojana 2022: नमस्कार शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक सहाच्या पत्रांमुळे. दिलेल्या मान्यतेनुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून एक वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे.

खरीप 2022 व रब्बी 2022 हंगामासाठी राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी पिक विमा क्षेत्र घटक धरून राबवण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे.

Pik Vima Yojana 2022

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. संदर्भ क्रमांक दोन व तीन अन्वये सदरची योजना खरीप हंगाम 2020 पासून तीन वर्षासाठी राबवण्यात मान्यता देण्यात आली होती.

तथापि केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक सहा अन्वये cub & cap मॉडल (८०:११०) नुसार. योजनेची अंमलबजावणी करणे करीता मान्यता दिली आहे.

हेही वाचा :- आपल्या जमिनीचा नकाशा पहा आता आपल्या मोबाईल कसे ते पहा 

त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप 2022 व रब्बी 2022 23 हंगामासाठी एका वर्षाकरिता राज्यात राबवण्यात ची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

योजनेची उद्दिष्टे

  1. नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे
  2. पिकाच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे
  3. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे
  4. कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठ्यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांचे संरक्षणाबरोबर अन्नसुरक्षा पिकाचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धेत स्पर्धकात्मक वाढ हे हेतू साध्या होण्यास मदत होईल

पिक विमा योजनेचा शासन निर्णय पाहण्यासठी येथे क्लीक करा

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

  1. सदरची योजना ही आदेशान्वये अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल.
  2. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
  3. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने आगर वाढपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
  4. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरवायचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी. दोन टक्के रब्बी हंगामासाठी 1.5% तसेच खरीपो रब्बी हंगामातील नगदी  पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
  5. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2023 या एका वर्षाकरिता जो खंड जोखीम स्तर सर्व अधिसूचित पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
पिक विमा योजना 2022

अधिसूचित क्षेत्र दिल अधिसूचित पिकांचे उंबरठाण उत्पादन ही मागील सात वर्षांपैकी. सर्वाधिक उत्पादनाच्या पाच वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचार घेऊन निश्चित केले जाईल उंबरठा उत्पादन. हे एक वर्ष कालावधी करिता असेल तसेच विमा कंपनीने सादर केलेल्या विमा हप्ता दरही या एक वर्ष कालावधी करिता असेल. 

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान असा करा अर्ज 

कोणत्या पिकासाठी मिळणार विमा 

या पिक विमा योजनेमध्ये कोणते पिके समाविष्ट करण्यात आलेली आहे. ते आपण पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत तृणधान्य पीके गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. सदरील योजना राज्यात शासनाने खरीप व  रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ गट किंवा तालुकास्तरावर खालील अधिसूचित पिकासाठी राबवण्यात येईल.

तृणधान्य व कडधान्य पिके: खरीप हंगाम भात खरीप ज्वारी बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका

रब्बी हंगाम: गहू रब्बी ज्वारी  बागायतीव जिरायती हरभरा ,उन्हाळी भात

गळीत धान्य पिके: खरीप हंगाम भुईमूग, कारले, तीळ, सूर्यफूल ,सोयाबीन:  रब्बी हंगाम: उन्हाळी भुईमुग

नगदी पिके: खरीप हंगाम :कापूस खरीप कांदा, रब्बी हंगाम: रब्बी कांदा

या पिकांसाठी 2022 23 मध्ये पिक विमा हा देण्यात येणार आहे


📢 जमिनीची मोजणी आपल्या मोबिल वर कशी करावी :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु 2022 :- येथे पहा 

1 thought on “Pik Vima Yojana 2022 | खरीप व रबी हंगाम 2022-23 साठी पिक विमा जाहीर शासन निर्णय आला”

Leave a Comment

close button
error: Content is protected !!