Pik Spardha Yojana | पहा अर्ज कसा करायचा पहा सविस्तर माहिती

तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करा अर्ज 

  • अर्जासोबत प्रवेश फी
  • सात बारा
  • आठ अ चा उतारा
  • जात प्रमाणपत्र

हे कागदपत्र आवश्यक असून 31 डिसेंबर पर्यंत तालुका कृषी कार्यालयात अर्ज सादर करावा.

स्पर्धेच्या अटी 

किमान दहा आर जमीन क्षेत्रावर पीक घेणे गरजेचे आहे. स्पर्धेतून माघार घ्यायची असल्यास कापणीच्या पंधरा दिवसा अगोदर संबंधित शेतकऱ्यांना लेखी सांगावी लागणार आहे.

सर्व शेतकऱ्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. आदिवासी यांनी सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा स्वतंत्र घेण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर मुदत देण्यात आली आहे.

31 डिसेंबर ची डेट लाईन

रब्बी हंगामा ज्वारी गहू हरभरा स्पर्धेसाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात योजनेची जनजागृती करण्याची गरज आहे.