Petrol Diesel Price Maharashtra | पेट्रोलच्या दरात 5 रु तर डीझेल च्या दरात 3 रु झाली घट ! पहा तुमच्या कडे कित आहे दर

Petrol Diesel Price Maharashtra | पेट्रोलच्या दरात 5 रु तर डीझेल च्या दरात 3 रु झाली घट ! पहा तुमच्या कडे कित आहे दर

Petrol Diesel Price Maharashtra

Petrol Diesel Price Maharashtra:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राज्यात पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आत कॅबिनेट बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यात काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय़ घेण्यात आले. त्यात राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

सध्या महाराष्ट्रात मुंबईत पेट्रोलचे दर 111 रुपये प्रति लीटर एवढे आहेत. तर डिझेलचे दर 97 रुपये प्रति लीटर एवढे आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार लवकरच या दरात कपात करण्यात येईल. केंद्र सरकारने इंधनाच्या दरात आधीच कपात केली होती. त्यानुसार राज्य सराकरांनाही दरकपातीचं आवाहन केलं होतं.

मात्र मविआ सरकारने या आवाहानाला प्रतिसाद दिला नव्हता. आता भाजप-शिंदे गटाचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिलासादयक निर्णय घेतला असून ही इंधनदरात कपात केली आहे.

हेही वाचा : सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु येथे करा ऑनलाईन अर्ज 

Petrol Diesel Price Maharashtra

आज कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ सरकार हे सामान्यांना दिलासा देणारं आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचं काम आम्ही टप्प्याटप्प्याने करणार आहे. मला आनंद आणि समाधान वाटतं.

आम्ही एक निर्णय घेतला आहे. देशात पेट्रोल डिझेलचे दर कच्च्या तेलावर अवलंबुन आहे. त्यामुळे त्यात वाढ होत आहे. राज्यभरात पेट्रोल डिझेलवर वाढ होत आहे. केंद्राने 4 नोव्हेंबर आणि 22 मे 2022मध्ये मोदींनी इंधन दरात कपात केली होती.  त्यांनी सरकारला आवाहन केलं होतं. कर कमी करा म्हणून सांगितलं होतं.

परंतु काही राज्यांना त्यांचं आवाहन मान्य करून दर कमी केले होते. पण राज्य सरकारने केले नव्हते. युतीचं सरकार आल्यानंतर आपली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे. पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहा हजार कोटीचा शासनाच्या तिजोरीवर भार पडेल..अशी माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा : नवीन घरकुल योजने अतर्गत मिळत आहे 1.2 लाख रु अनुदान येथे करा अर्ज

निर्णयापूर्वीचे पेट्रोलचे दर किती?

मुंबई – 111.35 रुपये प्रति लिटर पुणे- 11.75 रुपये प्रति लिटर नागपूर- 111.18 रुपये प्रति लिटर नाशिक- 111.45 रुपये प्रति लिटर औरंगाबाद- 112.82 रुपये प्रति लिटर

निर्णयापूर्वीचे डिझेलचे दर किती?

मुंबई – 97.28 रुपये प्रति लिटर पुणे- 95.69 रुपये प्रति लिटर नागपूर- 111.18 रुपये प्रति लिटर नाशिक- 95.69 रुपये प्रति लिटर औरंगाबाद- 97.24 रुपये प्रति लिटर


📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!