Pesticide | शेतकऱ्यांना मिळणार ऑनलाईन कीटकनाशके

शेतकऱ्यांचा वेळ वाचणार

कीटकनाशके येथे शेतकऱ्यांच्या दारात पोहोचल्यास शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे. शेतकऱ्यांना चांगली कीटकनाशके देखील उपलब्ध होतील ही कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेही जावे लागणार नाही.

घरपोच त्यांना कीटकनाशके मिळणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे कंपन्यांनी म्हटल आहे. भारतातील ॲमेझॉन आणि flipkart या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यासह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईटवर कीटकनाशके उपलब्ध होणार आहेत.

त्यामुळे आता शेतकऱ्यांना योग्य व सुरक्षित कीटकनाशके खरेदी करण्यासाठी फारसा पैसा खर्च करावा लागणार नाही. तसेच विनाकारण दुकानांमध्ये फिरण्याची गरज पडणार नाही शेतकरी फक्त ऑनलाईन ऑर्डर देऊन कीटकनाशकाची होम डिलिव्हरी मिळवू शकतात.