Pashusanvardhan Vibhag Yojana Best | पशुसंवर्धन विभागांतर्गत 4 शेळ्या व 1 बोकड 75% अनुदानावर वाटप सुरु, अर्ज डाउनलोड करा

Pashusanvardhan Vibhag Yojana: महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत वैयक्तिक लाभाची योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर चार शेळ्या व एक बोकड वाटप करण्यात येत आहे.

तसेच 50% अनुदानावर पशुपालकांना मिल्किंग मशीन वाटप करण्यात येत आहे. ही योजना 25 ऑगस्ट 2023 पासून 25 सप्टेंबर 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. वरील योजना चा अर्जाचा नमुना सोबत जोडलेला असून या अर्जाचा नमुना खाली लिंक वर डाऊनलोड करून संबंधित पंचायत समितीकडे तुम्हाला सादर करायचे आहेत.

Pashusanvardhan Vibhag Yojana

Table of Contents

हा अर्ज व तसे प्रसिद्धीकरण वृत्तपत्रातून करण्यात येणार असून त्यामधील नमूद केलेल्या कालावधीत म्हणजे 25 ऑगस्ट 2023 ते 25 सप्टेंबर 2023 पर्यंत लाभार्थ्याचे अर्ज पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यावर पशुपालकांना जमा करण्याबाबत सूचना देण्यात आलेले आहेत.

तुमचे अर्ज जे आहेत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात मधील पशुपालकांना सुद्धा देऊ शकता तसेच जिल्हा वार्षिक योजनेबद्दल सोबत जोडलेल्या तक्त्यानुसार योजना राबविण्यात येत असून सदर योजना संगणक प्रणाली (Pashusanvardhan Vibhag Yojana) द्वारे राबविण्यात येणार आहे त्यामुळे अर्ज च विहित नमुना व जिल्हा वार्षिक योजनेचा तक्ता खाली दिलेला आहे.

सविस्तर माहिती

सविस्तर माहिती वाचून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता योजनेची बाकीची डिटेल सर्व पीडीएफ मध्ये दिलेले आहे पीडीएफ डाऊनलोड करून व्यवस्थित वाचून तुम्ही अर्ज सादर करावा,अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे.

तो अर्ज व्यवस्थित रित्या भरून अर्जा सोबत 01 मे 2019 नंतर दोन पेक्षा जास्त आहेत आपत्य नसल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला, पशुपालकाकडे (Pashusanvardhan Vibhag Yojana) विद्युत पुरवठा असले बाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाचेदेयक (वीजबिल),

4 शेळ्या व 1 बोकड योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

लाभार्थ्याची कुटुंबातील व्यक्तीच्या नावे जमीन असल्याबाबतचा सातबारा व आठ अ चा उतारा, पशुपालकाकडे दूध देणारे किमान पाच दुधाळ जनावर असलेल्या बाबतचे शासकीय पशुवैद्यकीचा दाखला, फोटो ओळखपत्राचे सत्यप्रत आणि रेशन कार्ड ची सत्यप्रत सोबत जोडायची आहे.

Leave a Comment