Panjabrao Dakh Rain Update :-भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा वगळता राज्यात संपूर्ण महिनाभर पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे पहिल्या आठवड्यात देखील तुरळक ठिकाणीच हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. खरंतर जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. अनेक भागात अतिवृष्टी झाली. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Panjabrao Dakh Rain Update
मात्र आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून पूरस्थिती देखील निवळत चालली आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यातही कमी पावसाचा अंदाज आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाबरावांनी ऑगस्ट महिन्यातील आपला हवामान अंदाज 31 जुलै 2023 रोजी जारी केला आहे. अशा परिस्थितीत आज आपण पंजाबरावांनी (Panjabrao Dakh Rain Update) आपल्या सुधारित हवामान अंदाजात काय म्हटल आहे याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हणताय पंजाबराव डख
पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, एक ऑगस्टपासून राज्यातून पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र असे असले तरी एक ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान राज्यातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
या कालावधीत ज्या भागात पाऊस पडेल तिथे पंधरा ते वीस मिनिटे पाऊस राहील आणि त्यानंतर लगेच ऊन पडेल असे समिश्र वातावरण राहणार आहे. चार तारखेपर्यंत ऊन पावसाचा हा खेळ सुरू राहणार आहे. मात्र तदनंतर राज्यातून पाऊस थोडाकाळ विश्रांती घेणार असा अंदाज आहे.
पंजाबराव डख हवामान
जवळपास 13 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज आहे. मात्र 13 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात(Panjabrao Dakh Rain Update)होणार आहे. 14 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडणार अशी शक्यता पंजाबराव यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
✍️ हेही वाचा :- छतावर सौर पॅनेल मोफत बसवता येतील, 20 वर्षांसाठी मोफत वीज उपलब्ध असेल, येथून त्वरित ऑनलाइन अर्ज करा.