Panjab Dakh Weather Update Best | शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी हवामानात अचानक झाला मोठा बदल, 21 एप्रिलपासून पुन्हा ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार

Panjab Dakh Weather Update: हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक मोठा हवामान अंदाज वर्तवला आहे. वास्तविक या चालू एप्रिल महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

डखं यांनी एक एप्रिल रोजी या चालू महिन्यातील पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस आणि गारपीट झाली आहे. दरम्यान आता डक यांनी नवीन हवामान अंदाज सांगितला आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यात 21 एप्रिल पासून पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे.

Panjab Dakh Weather Update

21 एप्रिल म्हणजेच शुक्रवारपासून ते 28 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पडणारा पाऊस मात्र सर्व दूर राहणार नाही तर फक्त पाच ते सात जिल्ह्यात पडेल असा अंदाज आहे.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजात डखं यांनी पुढील महिन्यात अर्थातच मे महिन्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे. मे महिन्यात पाच मे आणि सहा मे रोजी पाऊस पडणार आहे. यानंतर राज्यात पावसाची उघडीप राहील.

कसे असणार हवामान 

मात्र 15 मे ते 16 मे दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पावसाचे वातावरण तयार होईल आणि पाऊस पडेल असे मत त्यांनी व्यक्त केल आहे. याशिवाय, आज भारतीय हवामान विभागाने देखील राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य (Panjab Dakh Weather Update) महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे.

यामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना सजग आणि सतर्क रहावे लागणार आहे. तसेच राज्यात उष्णतेची देखील लाट येण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ होणार असून राज्यातील बहुतांशी भागात उकाडा देखील जाणवणार आहे. एकंदरीत राज्यात सध्या मिश्र हवामानाची अनुभूती होत आहे. 


📢 शेतात पाईप लाईन करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment