Onion Market Rate | कांदा दरवाढ रोखण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय ! शेतकऱ्यांना फटका बसणार

Onion Market Rate | कांदा दरवाढ रोखण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय ! शेतकऱ्यांना फटका बसणार

Onion Market Rate

Onion Market Rate: नमस्कार आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. तर आपल्या देशात कांदा उत्पादक शेतकरी हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पण कांद्याला भाव नसल्या कारणाने त्यांना आता कांदा पीक हे परवडत नाही आहे.

आणि मागील काही दवसात कांद्याचे भाव हे वाढत आहे. अशातच केंद्र सरकार हे कांद्याच्या दर वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय घेतला आहे. या मुळे आता परत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

 Onion Market Rate

सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, मोदी सरकारने कांद्याची दरवाढ होऊ नये, यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

देशात सध्या कांद्याचा सरासरी भाव 25.78 रुपये प्रतिकिलो आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर 9 टक्क्यांनी कमी आहे. मात्र, भविष्यात ते वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही दरवाढ होऊ नये, यासाठी मोदी सरकारने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. काद्यांच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत.

हेही वाचा : जिल्हा परिषद योजने अतर्गत शेळी पालन साठी शासन देते आहे 75% अनुदान येथे पहा माहिती  

का घेतला गेला हा निर्णय 

नागरिकांना स्वस्तात कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी मोदी सरकारने पुढील महिन्यापासून आपल्या ‘बफर स्टॉक’मधील कांदा बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील बाजारात केंद्र सरकार कांदा पुरवठा करणार आहे. केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

ते म्हणाले, की केंद्राच्या ‘बफर स्टॉक’मधील कांदा ऑगस्टपासून मंडईत दाखल होईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत त्याचा पुरवठा केला जाईल. नियंत्रित पद्धतीने हा कांदा बाजारात आणला जाणार असल्याची माहिती चौबे यांनी दिली.

कंदाचे दर वाढू नाय म्हणून काय केले 

कांद्याचे दर वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकारने 2.50 लाख टन कांद्याचा ‘बफर स्टॉक’ तयार केला आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक ‘बफर स्टाॅक’ आहे. शिवाय, देशभर यंदा कांद्याचे बंपर उत्पादन झाले. त्यामुळे सरकारी कांद्याची खरेदीही विक्रमी पातळीवर झालीय. हाच कांदा मार्केटमध्ये आणण्याचा मोदी सरकारचा प्लॅन आहे.

हेही वाचा : कुकुट पालन साठी शासन देत आहे 75% अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

मोदी सरकार यंदा बफर स्टाॅकमधील कांदा मार्केटमध्ये आणणार असल्याने वर्षभर तरी कांद्याचे भाव कमीच राहण्याची शक्यता आहे. त्याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. इतर पिकातून हातात काहीच पडत नाही. त्यात सरकारच कांदा पुरवठा करणार असल्याने यंदा कांदा पिकातून पदरात फारसे काही पडणार नसल्याचेच दिसते.


📢 सायकल खरेदी साठी शासन देत आहे 5 हजार रु अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते आहे 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!