Nuksan Bharpai Maharashtra | फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 10 ते 25 हजार रु हेक्टरी नुकसान भरपाई

Nuksan Bharpai Maharashtra: नमस्कार शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10 ते 25 हजार रु नुकसान भरपाई म्हणून देणार आहे. राज्यामध्ये 2020मध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. या नुकसान भरपाईची आता नुकताच जी आर आला आहे. आणि यात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई चा लाभ मिळणार आहे. हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Nuksan Bharpai Maharashtra

जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आलेला आहे.

३३६४.०६ लाख रुपये म्हणजेच तेहतीस कोटी चौसष्ट लक्ष सहा हजार रुपये एवढा निधी अतिवृष्टी व पुरामुळे. बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिला जाणार आहे.

10 ते 25 हजार प्रती हेक्टर नुकसान भरपाई मिळणार

हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे या संदर्भातील यादी देखील दिनांक १५ जुलै २०२२ रोजी काढण्यात आलेल्या जी आर सोबत दिलेली आहे.

हेही वाचा : 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येठेयेथे माहिती पहा 

शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे दिली जाणार मदत.

महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०२० या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या पूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे अशाच बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके या करिता 10 हजार रुपये प्रती हेक्टर एवढी मदत शासनाकडून दिली जाणार आहे तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी २५ हजार रुपये प्रती हेक्टर मदत दिली जाणार आहे. हि मदत जी दिली जाणार आहे ती दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे.

यादी पहा

खालील जिल्ह्यातील जिल्हातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 10 ते २५ हजार रुपयांपर्यंत मदत.

  • अमरावती.
  • बुलढाणा.
  • नाशिक.
  • जळगाव.
  • अहमदनगर.
  • सातारा.
  • सांगली.
  • सोलापूर.
  • कोल्हापूर.
शासन निर्णय GR पहा

कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हि नुकसानभरपाईचा निधी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शासनाचा निर्णय पाहण्यासठी येथे क्लिक करा 

शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये विविध पिकांची मोठ्या कष्टाने लागवड करत असतात. परंतु नैसर्गिक अप्पातीमुळे हातात आलेले पिक नष्ट होते. अशावेळी शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतात लागवड केलेल्या पिकांचा पिक विमा काढला तर नक्कीच त्यांना नुकसान भरपाई मिळते.

त्यामुळे शेतकरी बांधवानी आपापल्या शेतातील पिकांचा पिक विमा सादर करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून द्यावा. खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे.


📢 नवीन विहीर बाधानी साठी शासन देत आहे 100% अनुदा :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देत आहे 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!