Navin Vihir Yojana 2022 | पोकरा विहीर 100% अनुदानावर योजना 2022 सुरु

Navin Vihir Yojana 2022 | पोकरा विहीर 100% अनुदानावर योजना 2022 सुरु

Navin Vihir Yojana 2022

Navin Vihir Yojana 2022 : नमस्कार शेतकरी मित्रानो आम्ही आज आपल्याठी  शासनाच्या नवीन योजने बद्दल माहिती घेऊन आलो आहे. म्हणजेच आपण या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. आणि कुठून व त्यासाठी लागणारे कागद, पत्रे  नियम व अटी. आणि आपल्याला किती टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे. या बद्दल ची सविस्तर  माहिती जाणून घेणार आहोत. त्या साठी आपण हा पूर्ण वाचा.

पोकरा नवीन विहीर योजना 2022

अ. योजनेत कोण सहभागी होऊ शकतात – ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी. ब) अर्ज कुठे करावा – इच्छुक शेतकऱ्यांनी  https://dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.  क) आवश्यक कागदपत्रे –  7/12 व 8 अ.

नवीन विहीर योजना लाभार्थी पात्रता

विहीर घेण्यासाठी एकूण जमिनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. २. संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून. यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही. ३. प्रस्तावित नवीन विहीर व पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक स्त्रोत यातील अंतर ५०० मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ४. प्रस्तावित विहीर. व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरींचे अंतर १५० मीटर पेक्षा जास्त असणे (Navin Vihir Yojana 2022) आवश्यक आहे.

सिंचन विहीर अनुदान योजना 2022

गावामधील अस्तित्वातील व प्रस्तावित असे एकूण सिंचन विहिरींची घनता लागवडी योग्य क्षेत्राच्या ८ विहिरी प्रति चौरस किलोमीटर असणे आवश्यक आहे. ६. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ७. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरी घेण्यास मनाई आहे. ८. नावीर विहीर खोदणे व अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी कमाल १ वर्षाचा कालावधी अनुज्ञेय आहे. इ) अर्थसाहाय्य – १०० टक्के रुपये २.५० लाख. अनुदान थेट लाभार्थीच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते.

📢 गाय पालन योजना 2022 :- येथे पहा 
📢 pm किसान योजनेचा ११ वा हफ्ता :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!