Nivin Vihir Anudan Yojana | नवीन विहीर अनुदान योजना | विहीर योजना 2022

Nivin Vihir Anudan Yojana | नवीन विहीर अनुदान योजना | विहीर योजना 2022

Nivin Vihir Anudan Yojana

Nivin Vihir Anudan Yojana : राज्य शासनाचे हिचं गोष्ट लक्ष्यात घेतली आहे आणि शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या साहाय्याने मदतीचा हात दिला आहे. चला तर मित्रांनो पाहुयात काय आहे हि योजना आणि काय आहेत या योजनेचे लाभ आणि कुठे करावा अर्ज याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत.

विहीर अनुदान योजना ऑनलाइन फॉर्म

जर तुम्ही आजपर्यंत महाडीबीटी वरील कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसेल, आणि तुम्हला त्या योजनांचा लाभ घेयचा असेल,तर त्याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, शेतीची अवजारे, ट्रॅक्टर ,कृषी सिंचन यांसाठी अर्ज कसा करायचा या प्रश्नाच्या उत्तरे आम्ही आज तुम्हला देणार आहोत. त्यासाठी लवकरच रेजिस्ट्रेशन करून महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घ्या . सध्या अर्ज चालू आहेतरजिस्ट्रेशन पासून ते अर्ज भरून पेमेंट पर्यंतची सर्व माहिती पाहण्यासाठी खालील विडिओ नक्की पहा. आणि अर्ज करून योजनांचा लाभ नक्की घ्या. जर तुम्ही 2022-23 साठी महाडीबीटीवर अर्ज केलेला होता, लॉटरीत नाव आले का नाही, पूर्वसंमती मिळाली का नाही ते कसे बघायचे, ते असे पाहायचे (Nivin Vihir Anudan Yojana) आणि कागदपत्रे कधी अपलोड करायची अशे प्रश्न तुम्हला नक्कीच पडले असतील, त्यासाठी खालील विडिओ पहा.

👉👉शेतकऱ्यांना ५० पेक्षा जास्त योजना 2022 करिता ऑनलाईन फॉर्म सुरु :येथे पहा 👈👈

 नवीन विहीरअनुदान योजना

मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. 

नवीन विहिर बांधण्यासाठी– रु. २,५०,००० (अडीच लाख )

जुनी विहीर दुरुस्ती– रु. ५०,००० (पन्नास हजार)
इनवेल बोअरींग– रु. २०,००० (वीस हजार )
पंप संच– रु. २०,००० (वीस हजार )
वीज जोडणी– रु. १०,००० (दहा हजार )
शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण– रु. १,००,००० (एक लाख)
सुक्ष्म सिंचन संच– ठिबक सिंचन ५०,०००(पन्नास हजार) किंव्हा तुषार सिंचन २५,००० (पंचवीस हजार)
पीव्हीसी पाईप– रु. ३०,००० (तीस हजार)
परसबाग– रु. ५०० (पाचशे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2022 

 • लाभार्थी शेतकरीअनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • जमिनीच्या ७/१२ व ८-अ चा उतारा सादर करणे आवश्यक आहे.
 • लाभार्थीं शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असणे बंधनकारक असणार आहे.
 • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थीची जमिनधारणा ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर) असणे गरजेचे असणार 

👉👉ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 👈👈

नवीन विहीरीकरीता आवश्यक कागदपत्रे 
 • अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
 • ७/१२ व ८-अ चा उतारा
 • तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र ( रु. १,५०,०००/- पर्यंत).
 • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर)
 • अपंग असल्यास प्रमाणपत्र
 • तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (०.४० ते ६ हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून ५०० फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
 • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
 • कृषि अधिकारी यांचे क्षेत्र पाहणी व शिफारसपत्र
 • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
 • ज्या जागेवर विहीर खोदायची आहे त्या त्या जायचा विशिष्ट खुणेसहित लाभार्थ्यासहित फोटो.
 • ग्रामसभेचा ठराव

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!