Nabard Dairy Loan Apply Online: प्रत्येकाला काही ना काही व्यवसाय करुन पैसे कमवावे वाटते. जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला एका खास व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्ही शेतकरी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. कारण शेतकऱ्यांना शेळी, गाय, म्हैस अशी जनावरांना बाबत माहिती असते.
Nabard Dairy Loan Apply Online
शेती सोबतच पशुपालन करून दुधाचे उत्पादन मिळवून त्याची विक्री करुन चांगला पैसा कमावू शकता. dudh dairy दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी म्हणून मोदी सरकार तुम्हाला दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अनुदान देणार आहे. चला तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ या.
दुध डेअरी व्यवसाय
जर तुम्हाला दुध डेअरी व्यवसाय करायचा असेल तर यासाठी केंद्र सरकारकडून 33 टक्क्यापर्यंत अनुदान दिले जाते. सरकार दुग्धव्यवसाय उभारण्यासाठी जे अनुदान देत असते, ते नाबार्ड मार्फत शेतकऱ्यांना दिले जाते.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करु शकतात?या योजनेसाठी शेतकरी आणि वैयक्तिक उद्योजक आणि स्वयंसेवी संस्था आणि संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कंपन्या आणि गट, संघटित क्षेत्रातील बचत गट, दुग्ध सहकारी संस्था, दूध संघ अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्हाला बॅंकाकडून कर्ज दिले जाते.
अनुदान किती मिळणार?
या व्यवसायासाठी डेअरी युनिटच्या किंमतीच्या 25 टक्के सर्वसाधारण वर्गासाठी आणि 33 टक्के अनुदान अनुसूचित जाती/जमाती मधील शेतकऱ्यांना दिले जाते. या योजनेअंतर्गत सर्वसाधारपणे 20 (Nabard Dairy Loan Apply Online) लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) बॅंक पासबुक
3) जातीचे प्रमाणपत्र
4) बॅंकेचे ना हरकत प्रमाणपत्र
5) डेअरी स्टार्टअप प्रकल्प अहवाल
अर्ज कुठे करायचा?