Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना; बेरोजगारांना मिळणार 25 लाखापर्यंत अर्थसहाय्य, असा करा ऑनलाईन अर्ज

Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना; बेरोजगारांना मिळणार 25 लाखापर्यंत अर्थसहाय्य, असा करा ऑनलाईन अर्ज

Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana

Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana: बेरोजगारांनासाठी एक नवीन जबरदस्त योजना आली आहे. त्या योजनेचे नाव ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना’ आहे. या योजनेतंर्गत बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच अनुदान देखील मिळणार आहे.

‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने’मार्फत तरुणांना कशाप्रकारे रोजगार उपलब्ध करून दिल्या जाईल तसेच शासनाच्या मार्फत किती अनुदान आणि अनुदान कशाप्रकारे अनुदान दिल्या जाणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

या योजनेच्या लाभात मोठे अर्थसहाय्य मिळते. तुम्ही जर 7वी उत्तीर्ण असाल, तर 10 लाख अर्थसहाय्य मिळू शकते. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, तर 25 लाख रुपये अर्थसहाय्य मिळू शकते.

Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील वाढती बेरोजगारीमुळे तरुणांना अवघड परिस्थिती झाली. तरुणांना या बेरोजगारीमुळे भविष्याचे टेन्शन आले. या तरुणांनाचा सरकारने सर्वसमावेशक योजनेचा सुरू केली आहे.

योजनेचे उद्दिष्ट

पुढील 5 वर्षात 1 लक्ष सूक्ष्म व लघु उपक्रम स्थापीत करणे. या उपक्रमाच्या माध्यमातून 10 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत.

लाभार्थी पात्रता

कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे.
वय 18 ते 45 वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे. (अनुसूचित जाती/ जमाती/ महिला/अपंग /माजी सौनिक करिता 5 वर्षे वयोमर्यादा वाढीव असेल)
वैयक्तिक मालकी, भागीदारी व बचत गट ज्यांना वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेली असावी.

शैक्षणिक पात्रता – 7वी आणि 10 वी उत्तीर्ण
पती किंवा पत्नी कोणाला तरी एका व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. (mukhyamantri rojgar nirmiti yojana online form maharashtra)

 

योजनेचे आर्थिक सहाय्य
 • अनुसूचित जाती/ जमाती/ महिला/ अपंग व माजी सैनिकांसाठी
  स्वगुंतवणूक 5 टक्के
 • देय अनुदान शहरी भागांसाठी 25 टक्के, तर ग्रामीण भागांसाठी 35 टक्के
 • बॅंक कर्ज शहरांसाठी 70 टक्के तर, ग्रामीणसाठी 60 टक्के
उर्वरित प्रवर्गासाठी
 • स्वगुंतवणूक 10 टक्के
 • शहरी भागांसाठी 15 टक्के अनुदान, तर ग्रामीण भागांसाठी 25 टक्के अनुदान
 • शहरी भागांसाठी 75 टक्के बॅंक कर्ज, तर ग्रामीण भागांसाठी 65 टक्के बॅंक कर्ज

 

आवश्यक कागदपत्रे
 1. पासपोर्ट फोटो
 2. अधिवास दाखला
 3. आधार कार्ड
 4. शाळा सोडल्याचा दाखला
 5. मार्कशीट
 6. पॅन कार्ड
 7. प्रोजेक्ट रिपोर्ट
 8. जात प्रवर्गातील असल्यास, जातीचा दाखला
 9. घोषणापत्र किंवा हमीपत्र

या योजनेचा शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

असा करा ऑनलाईन अर्ज
 • सर्वप्रथम उद्योग संचालनालयाच्या https://maha-cmegp.gov.in/homepage वेबसाईटवर जा.
 • येथे ऑनलाईन अर्ज असे एक निळ्या रंगाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
 • ऑनलाईन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
 • तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल, अर्जात व्यवस्थित संपूर्ण माहिती भरून तुमचा अर्ज सबमिट करा. (mukhyamantri rojgar nirmiti yojana online apply maharashtra)

‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला घोषणा पत्र, अहवाल नमुना लागणार आहे तर हे डाऊनलोड करण्यासाठी खाली दिले आहेत. तसेच जीआर देखील डाऊनलोड करण्यासाठी दिलेला आहे.

घोषणा पत्र डाऊनलोड करा 👇

प्रकल्प अहवाल डाऊनलोड करा 👇

तुम्ही जर देखील बेरोजगार असाल आणि 7वी, 10वी पास असाल तर या योजनेचा लाभ घेऊन अर्थसहाय्य मिळू शकतात. तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे देखील तुम्हाला समजेल आहे.

प्रकल्प अहवाल डाऊनलोड करा 👇


📢 एसबीआय बँक देत आहे जमीन जमीन खरेदी साठी 85% पर्यंत कर्ज :- येथे  पहा 

📢 नवीन विहीर बनवण्यासाठी मिळतंय 3 लाख रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!