Msrtc St Bus New Service | खिशात एक रुपया नसला, तरी एसटीचा प्रवास करता येणार, जाणून घ्या एसटी महामंडळाची ही खास सुविधा

Msrtc St Bus New Service | खिशात एक रुपया नसला, तरी एसटीचा प्रवास करता येणार, जाणून घ्या एसटी महामंडळाची ही खास सुविधा

Msrtc St Bus New Service

Msrtc St Bus New Service :- एसटीचा प्रवास हा सुखाचा प्रवास आहे.‌ सामान्य नागरिकांना कमी खर्चात दूरचा प्रवास करता येतो. एसटीत अनेक प्रवासी असतात आणि त्यामध्ये कंडक्टरला सर्वांचे तिकीट काढावे लागतात.

यामध्ये पैशामुळे प्रवाशी आणि कंडक्टरचे होणारे वाद काही नवीन नाहीत. परंतु, आता प्रवासी आणि कंडक्टरमध्ये असे वाद होणार नाहीत. एसटी महामंडळाने हा प्रकार टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या खिशात एक रुपया जरी नसला.

तरी त्यांना एसटीचा प्रवास करता येणार आहे. आताच्या या काळात मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट केलं जातंय. एसटी महामंडळाने डिजिटल पेमेंट बाबत मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने एकूण पाच हजार नव्या स्वाईप मशिन खरेदी केल्या आहेत.

Msrtc St Bus New Service

आता ‘फोन पे’, ‘गुगल पे’द्वारे तिकीटे काढता येणार..! :या नवीन स्वाईप मशीनमुळे ग्राहक आता डिजिटल पेमेंट करू शकेल. ‘फोन पे’, ‘गुगल पे’ ‘पेटीएम’ अशा ‘युपीआय’द्वारे ऑनलाईन पैसे देऊन एसटीचे तिकीट काढता येणार आहे. यामुळे सुट्या पैशाचं प्रश्नच राहणार नाही.

एसटी महामंडळाने हे स्वाईप मशिन पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 विभागांना दिले आहेत. यामध्ये लातूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, चंद्रपूर व भंडारा अशा सात विभागांना हे नवीन स्वाईप मशिन दिले आहे.

Msrtc St Bus New Service

हेही वाचा; 50 हजार प्रोत्साहन अनिदन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 

ST Bus New Service

काही महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाने ‘स्वाईप मशिन’द्वारे एसटी तिकीटे देण्याची सुविधा सुरू केली होती. परंतु, त्यावेळी केवळ डेबिट व क्रेडिट कार्डद्वारेच तिकीटे दिली जात होती. यामध्ये अनेक अडचणी आल्यात.

अनेक मशीन बंद पडत असत. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने नव्या प्रणालीत आवश्यक ते बदल केले आहेत. आताच्या नवीन स्वाईप मशिनमध्ये ‘युपीआय’ची सुविधा करण्यात आली आहे.

यामुळे प्रवाशांना स्मार्टफोनमधील विविध पेमेंट ॲपच्या मदतीने एसटी तिकीट काढता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा आणि कंडक्टर दोघांचा देखील त्रास कमी होईल.

Msrtc St Bus New Service

हेही वाचा; नवीन कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

असं काढता येईल एसटी तिकीट

राज्यात सध्या सात विभागात या नवीन ‘स्वाईप मशिन’ उपलब्ध झालेल्या आहेत. त्यात लातूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, चंद्रपूर व गडचिरोली या सात विभागांचा समावेश आहे. राज्यातील उर्वरित विभागात जुलैपासून नवीन ‘स्वाईप मशिन’ उपलब्ध होतील.

कंडक्टरला ‘युपीआय’बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या नवीन स्वाईप मशिन मध्ये ‘क्यूआर’ कोडचा समावेश असेल. तो ‘क्यूआर’ कोड स्कॅन करून प्रवाशांना तिकिटाचे पैसे देता येईल.

डिजिटल पेमेंटचा निर्णय हा प्रवाशांसाठी घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने सध्या 5 हजार ‘स्वाईप मशिन’ खरेदी केल्या आहेत. या नवीन ‘स्वाईप मशिन’ बाबत वाहकांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रवाशांना लवकरच ‘डिजिटल पेमेंट’ करून तिकीटे काढता येणार आहे.

Msrtc St Bus New Service

हेही वाचा; नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!