Monsoon News | शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका, मान्सूनबाबत महत्वाची अपडेट

Monsoon News | शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका, मान्सूनबाबत महत्वाची अपडेट

Monsoon News

 Monsoon News: अर्धा जून महिना झालेला आहे, परंतु पाहिजे तसा मान्सून महाराष्ट्रात टिकून राहिलेला नाही. अनेक जिल्ह्यांत रोज ढगाळ वातावरण व सोसाट्या वारा देखील सुटत आहे, पावसासाठी पोषक वातावरण देखील तयार होत आहे. परंतु, चांगल्या प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या नाहीत.

Monsoon News

मान्सून लांबलेला तर नाही, परंतु मान्सूनचा वेग मात्र कमी झालेला आहे. यामुळे योग्य प्रमाणात जसा हवा तसा पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी पेरणी करावी की नाही, या गोंधळात अडकलेला आहे. तर शेतकऱ्यांनासाठी हवामान विभागाने मोलाची माहिती दिलेली आहे, तर ती माहिती आपण जाणून घेऊया. ‘Monsoon 2022’

मान्सून अपडेट

यंदा खरीप हंगामात 6 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर पिकांची लागवड होणार असल्याचे सांगण्यात येतं आहे. यासाठी लागणारे खत व बियाणे देखील योग्य प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील बियाण्याची व‌ खताची घरात साठवणूक केलेली आहे. आता फक्त शेतकरी पेरणी योग्य पावसाची वाट पाहत आहे. (Monsoon 2022 Update)

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50% अनुदान आजच करा अर्ज 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र ओलांडून मान्सून मराठवाड्यात देखील पोहोचला आहे. मान्सून तर पोहोचला आहे, परंतु पावसाचं कमी प्रमाण असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे यंदा शेतकरी देखील पेरणी करावी की नाही मोठ्या अडचणीत पडला आहे. ‘Monsoon in Maharashtra 2022’

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..!

येणाऱ्या पाच दिवसांत मान्सून दमदार देखील नसला, तरी पावसाची हजेरी तुरळक प्रमाणात राहील असं सांगण्यात आलंय. पाऊस स्थिरावल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका, अशी मोलाची माहिती हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिली आहे. (Punjab Dakh Havaman Andaj)

दरम्यान, मान्सूनची पकड पक्की नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आता मान्सूनच्या वाटेवरचे सर्व अडथळे दूर होऊन तो केव्हा बरसेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक ठिकाणी चांगला पाऊस देखील बरसला असेल, परंतु तो पाऊस स्थिरावल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. 

हेही वाचा :- कुकुट पालन साठी शासन देते 75% अनुदान आजच करा अर्ज

Monsoon News Maharashtra

शेतकऱ्यांनी सध्या तरी पेरणीची घाई करू नये. पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट देखील येऊ शकते. त्यामुळे पेरणीसाठी घाई करू नये. पाऊस स्थिरावल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात करावी.

हवामान विभागाने दिलेली मान्सून बाबतची माहिती शेतकऱ्यांनासाठी अतिशय महत्वाची माहिती आह आपणं थोडंसं सहकार्य करून, ही माहिती तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.


📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!