Mission Zero Drop Out | शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांना घेता येणार ऍडमिशन पहा ते कसे

Mission Zero Drop Out | शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांना घेता येणार ऍडमिशन पहा ते कसे

Mission Zero Drop Out

Mission Zero Drop Out : नमस्कार आपण पाहत आहोत. की गेल्या 2 ते तीन वर्ष्यात कोरोना मुले अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. आणि याचा परिणाम हा त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर झाला आहे.

कारण त्यांनी स्थलांतर केल्या नंतर त्याच्या मुलाचे जवळ जवळ 2 वर्ष हे शिक्षणापासून दूर झाले आहे. आणि आता त्यांना जर नवीन ऍडमिशन घ्याची सेल तर त्यांना इअर ड्रॉप लागणार आहे. पण त्या साठी आता शासनाने मिशन झिरो ड्रॉप आऊट चालू केले आहे. म्हणजे आता 6 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना इयर ड्रॉप लागणार नाही.

Mission Zero Drop Out

 शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना शाळेत परत आणण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मिशन झिरो ड्रॉप आऊटची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केली आहे.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती

शिक्षणाचा हक्क लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षण पुन्हा रुळावर आणण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉप आउट’ नावाची विशेष मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा :- पहा आपल्या जमिनीची मोजणी आपल्या मोबाईल वर कशी करावी 

राज्यातील शाळांमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ‘

मिशन झिरो ड्रॉप आउट’ मोहिमेची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केली आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी राज्य सरकारने हे अभियान सुरू केले आहे.

शैक्षणिक वर्ष गॅप राहणार नाही

शिक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. की, महामारीमुळे शिक्षणातील असमानता वाढली असेल. परंतु प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

गळती झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांना शाळेत परत आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील शाळा गळतीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणे हा या विशेष मोहिमेचा उद्देश आहे.

हेही वाचा :- कडबा कुट्टी मशीन साठी मिळणार 50% अनुदान  असा करा ऑनलाईन अर्ज

या अभियानांतर्गत साथीच्या रोगामुळे शिक्षण सोडलेल्या मुलांना पुन्हा शाळेत आणता येईल. माध्यमे आणि समाजाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोना आणि त्यानंतर लॉकडाऊन (Corona Lockdown) यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग (Online School) भरवण्यात आले.

आता चालू वर्ष्यात मिळणार ऍडमिशन

पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावं लागलं. सध्या राज्यात सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. अशातच, राज्यातील शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर होता.

हेही वाचा :- 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान आजच करा अर्ज 

राज्यभरात आजपासून म्हणजेच, 13 जूनपासून शाळा सुरु झाल्या आहेत. शिक्षण विभागानं यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली. शिक्षण आयुक्तांनी पत्रक काढत विदर्भ वगळता राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु झाल्या. तर विदर्भात मात्र शाळा 27 जूनपासून सुरू झाल्या आहेत. 


📢 नवीन ट्रॅक्टर साठी शासन देते अनुदान पहा ते किती :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे आहे 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!