Mini Tractor Scheme | फक्त 10% करा खर्च आणि 90% अनुदानावर खरेदी करा मिनी ट्रॅक्टर

Mini Tractor Scheme: मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया जेणे करून तुम्हाला या योजनाचा लाभ मिळू शकेल. शेती मध्ये विविध कामासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो विशेष म्हणजे मिनी ट्रॅक्टर.

Mini Tractor Scheme

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागतो या सर्व प्रकारची माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया.

मिनी ट्रॅक्टर योजना 90 टक्के अनुदानावर

शेतकरी बंधूंनो तुमच्याकडे तर मिनी ट्रॅक्टर असेल तर तुम्ही शेतामधील विविध कामासाठी या मिनी ट्रॅक्टरचा उपयोग करून आधुनिक पद्धतीने शेती करू शकता.

शेतकरी बंधुनो तुम्हाला जर मिनी ट्रॅक्टर  घ्यायचे असेल तर तुम्ही शासकीय अनुदानावर सुद्धा मिनी ट्रॅक्टर घेऊ शकता त्यासाठी शासनाकडून 90 टक्के अनुदान मिळते.

हेही वाचा : महिलां साठी फ्री शिलाई मशीन अनुदान योजना सुरु येथे पहा माहिती 

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो, अर्ज कुठे करावा लागतो. त्यासाठी काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी हे व्यक्ति असतील पात्र

अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयसहाय्यता बचत गटांना काहीतरी उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे व तसेच त्यांचे राहणीमान बदलावे या उद्देशाने ही योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्या ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेसाठी केवळ अनुसूचित जाती नवबौद्ध घटकतील अर्जदार मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करू शकतील.
योजनेचे नाव मिनी ट्रॅक्टर योजना
योजनेसाठी पात्र लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध
अर्ज कोठे करावा संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण कार्यालय
किती मिळणार लाभ 10 % स्वहिस्सा भरल्यानंतर 90 % ( कमाल 3.15 लाख )
मिनी ट्रॅक्टर योजना अटी खालील प्रमाणे
  • जे स्वयंसहाय्यता बचत असणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील नागरिक असावेत.
  • स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • बचत गटातील कमीत कमी 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे गरजेचे आहे.
  • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच आवश्यक असणारे साहित्य यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा रु. 3.50 लाख इतकी असेल,
  • स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.

हेही वाचा : नवीन विहीर साठी शासन देते 100 % अनुदान येथे पहा माहिती 

कोठे करावा लागणार अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत आणि या साठी कोणत्या अटी दिलेल्या आहेत हे आपण जाणून घेतलेले आहे. आता जाऊन घेवूयात कि या योजनेसाठी ऑनलाईन आज करण्यासठी कोठे अर्ज करावा लागतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयास तुम्हाला भेट द्यायची आहे. या कार्यालयामध्ये तुम्ही ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकता.

मिनी ट्रॅक्टर योजनाची  शासकीय माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


📢 कडबा कुट्टी मशीन अनुदानात झली मोठी वाढ :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!